दिप्ती देशमुख, मुंबई‘...सर्व आरोपांतून अर्जदाराची निर्दोष सुटका करण्यात येत आहे,’ हे शब्द कानी पडताच, ४९ वर्षीय ‘टायगर’ला एकदम धक्का बसला. न्यायाधीश उठून बाहेर जाईपर्यंत रोखून ठेवलेले अश्रू आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडताच सलमानच्या डोळ्यातून ओघळू लागले. सलमानला स्वत:ला आवरणे कठीण बनले होते. त्याच्या अश्रूंचा अक्षरश: बांधच फुटला. तेव्हा त्याला आवरण्यासाठी त्याचा बॉडीगार्ड शेरा पुढे सरसावला, तरीही सलमान स्वत:चे अश्रू लपवू शकला नाही.सोमवारपासून सलमानच्या अपिलावर निकालवाचन सुरू होते. सरकारी वकिलांचे सर्व महत्त्वाचे साक्षी-पुरावे न्या. ए. आर. जोशी यांनी खोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे सलमान सुटणार, हे जवळपास निश्चित झाले होते. सलमानसोबत कोर्टात बहीण अलविरा अग्निहोत्री, मेहुणा आयुष शर्मा, असिस्टंट रेश्मा शेट्टी हेदेखील उपस्थित होते. निकाल जाहीर होताच, त्याची असिस्टंट रेशमादेखील ढसाढसा रडली. अलविराचेही डोळे पाणावले होते. सलमानला सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावल्याने त्याला न्यायालयात बोलवण्यात येईल, अशी अपेक्षा वकील, पोलीस किंवा प्रसारमाध्यमांनाही नव्हती. फाशीची शिक्षा ठोठावण्याच आलेल्याच आरोपींना निकालावेळी उच्च न्यायालयात बोलावण्यात येते, असा पायंडा आहे. सकाळी न्यायालयाचे कामकाज ११ वाजता सुरू झाल्यानंतर न्या. जोशी यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास सलमानच्या वकिलांना सलमानला हजर करा, असे आदेश दिले. कायद्यात दुरुस्ती केल्याने आरोपीला निकाल देताना न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त कर्जतमधील फार्म हाउसमध्ये असलेल्या सलमानला तातडीने बोलवण्यात आले. त्याच्या वकिलांनी तो एक ते दोन वाजेपर्यंत न्यायालयात हजर राहील, असे न्या. जोशी यांना सांगितले. दीडच्या ठोक्याला काळया-पांढऱ्या चेक्सचा शर्ट आणि जीन्स घातलेला सलमान कोर्ट रूम नं. ४३ मध्ये हजर झाला. पत्रकार, वकील आणि कोर्टाचे कर्मचारी यांनी तुडुंब भरलेल्या कोर्ट रूममध्ये सलमानला कडक पोलीस बंदोबस्तात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. त्यानंतर बरोबर १:३४ मिनिटांनी न्या. जोशी डायसवर बसले. त्यांनी एकाच ओळीत निकाल सांगितला. ‘...सर्व आरोपांतून अर्जदाराची निर्दोष सुटका करण्यात येत आहे,’ असे न्या. जोशी यांनी म्हटल्यावर, १३ वर्षांपासून या वाक्याची वाट पाहणाऱ्या सलमानला एकदम धक्का बसला. त्याच्या चेहरा निर्विकार होता. मात्र, डोळे पाणावले होते. न्यायाधीश डायसवर असल्याने त्याने अश्रू रोखले होते. मात्र, १:३९ वाजता न्यायाधीशांनी कामकाज संपवून ते चेंबरमध्ये निघून गेल्यावर, सलमानला अधिक काळ अश्रू आवरणे कठीण गेले.पोलीस बंदोबस्तात त्याला आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आले. आता त्याचा ताबा त्याच्या अंगरक्षकांकडे होता. प्रचंड गर्दी असल्याने, सलमानला न्यायाधीशांच्या डायसच्या खालीच उभे करण्यात आले. काही प्रक्रिया पूर्ण व्हायच्या होत्या, म्हणून सलमानला तिथेच थांबणे भाग होते. मात्र, एवढ्या गर्दीतही सलमान स्वत:च्याच विश्वात गुंग होता. तो स्वत:ला आवरण्यासाठी सतत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. स्वत:चे अश्रू थांबवण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले. अखेरीस त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. समोर एवढी मोठी गर्दी असल्याने त्याने सगळ्यांकडे पाठ केली. मात्र, त्याच्या हाताच्या हालचालीवरून तो आपले अश्रू पुसत असल्याचे स्पष्ट होत होते. त्याचे अश्रू कोणालाही दिसू नयेत, यासाठी शेरा आणि अन्य एका बॉडीगार्डने त्याला मागे लपवले. सलमान भिंतीसमोर तोंड करून रडत होता. मात्र, त्याच भिंतीवर असलेल्या तसबिरीच्या काचेतून सलमान रडत असल्याचे सगळ्यांना दिसत होते. (प्रतिनिधी)>>> निकालाच्या दिवसाचा घटनाक्रमस. ११.०० वाजता कोर्टाचे कामकाज सुरूस. ११.३० वाजता सलमानला बोलावण्याचे आदेशदु. १२.३५ वाजता न्यायालयाचे कामकाज तहकूबदु. १.३० वा. सलमान कोर्ट रूममध्ये आलादु. १.३४ वा. न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरूदु. १.३५ वा. वा. निकाल जाहीरदु. १.३९ वा. न्यायालयाचे कामकाज तहकूब>>> सत्र न्यायालयात ठरवले होते दोषीभारतीय दंड संहिता कलम ३०४ (भाग २) -सदोष मनुष्यवध२७९ -बेदरकार, निष्काळजीपणे गाडी चालवणेकलम २२७ आणि ३३८ अन्वये जिवीताला हानी पोहोचेल असे कृत्य, गंभीर दुखापत करण्यास कारणीभूत४२७ मालमत्तेस नुकसान पोहोचेल असे कृत्य करणेमोटार वाहन कायदाकलम ३४ (अ), (ब) / १८१ -नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवणेकलम १८५ मद्यपान करुन बेदरकार गाडी चालवणेबॉम्बे प्रतिबंध कायदा... मद्यपान करुन गाडी चालवणेहायकोर्टाकडून मात्र सर्व आरोपांतून सबळ पुराव्यांअभावी मुक्तता.>>>>आता लक्ष ‘काळवीट’ प्रकरणाकडेजोधपूरमधील कांकणी गावात आॅक्टोबर १९९८मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटांची शिकार केल्याचा सलमानवर आरोप आहे. सलमानला या प्रकरणात राजस्थानमधील कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती देत सलमानला दिलासा दिला खरा, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवत फेरविचार करून पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या या आदेशानुसार राजस्थान उच्च न्यायालयात या प्रकरणी पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीत उच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. >>>आता दोनाचे चार हात होऊ द्यात - हेमा मालिनी‘बागबान’मध्ये सलमानच्या आईची भूमिका वठविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘आम्हाला त्याच्याबाबतीत मिळालेल्या निर्णयाबद्दल अत्यंत आनंद होत आहे, ही आमच्यासाठी सर्वात चांगली बातमी आहे. आता त्याने जरा स्थिर होऊन लग्न करावे, हीच आपली इच्छा आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.तर गुन्हेगार कोण ? - शोभा डेहा गुन्हा सलमानने नाही केला तर कोणी केला? एका व्यक्तीचे प्राण गेले, चार जखमी झाले. कोणी ना कोणीतरी गुन्हेगार असेलच ना...माझा भाऊ निर्दोषमाझा भाऊ निर्दोष होता त्यामुळे तो सुटेल याची खात्री होती. या निकालाने मी अत्यंत आनंदी आहे.- अलविरा खान-अग्निहोत्री, सलमानची बहिणपैशांमुळे तपासात कमतरतासलमान खानच्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात पोलिसांनी बक्कळ पैसा कमावल्याने तपासात कमतरता दिसली आहे. या प्रकरणात अभिनेता कमाल खान याला कोर्टात का हजर केले नाही, असा सवाल त्यांनी केला. याप्रकरणी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी.- आभा सिंह, ज्येष्ठ विधीज्ञ मोठ्या लोकांनी दारु पिणे सोडावेसलमान खानचे अभिनंदन. मात्र मोठे लोक दारु पिऊन गरिबांना चिरडतात. त्यामुळे अशा मोठ्या लोकांनी दारु पिणे सोडून द्यावे. - अबू आझमी, आमदार, समाजवादी पार्टीअभ्यासानंतर निर्णयया निकालाचा अभ्यास करुन पुढील दिशा ठरवू. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार अभ्यासाअंती करु.- अॅड. संदीप शिंदे, सरकारी वकील>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>घटनाक्रम28 सप्टेंबर2002 सलमान खानची पांढरी टोयोटा लँड क्रुझरची वांद्रे हिलरोड येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीला धडकली. यात एकाचा मृत्यू आणि चार जण जखमी२८ सप्टेंबर- सलमानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.२८ सप्टेंबर - वांद्रे पोलिसांकडून सलमानची अटक, जामिनावर सुटका१ आॅक्टोबर- भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा,१९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अतंर्गत सलमानवर गुन्हा दाखलआॅक्टोबर २००२- मुंबई पोलिसांनी सलमानविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०४( भाग-२ ) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. या कलमांतर्गत १० वर्षे कारावसाच्या शिक्षेची तरतूद आहे. ७ आॅक्टोबर २००२- सलमानची वांद्रे पोलिसांत पुन्हा शरणागती, सलमानची अटक२१ आॅक्टोबर २००२- मुंबई पोलिसांनी सलमानविरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल२४ आॅक्टोबर २००२- सलमानचा जामीन मंजूरमार्च २००३- भारतीय दंड संहिता ३०४ (भाग-२) लागू करण्यात आल्याबद्दल सलमानने सत्र न्यायालयात अपील केला.सत्र न्यायालयाने सलमानचा अर्ज फेटाळत दंडाधिकारी न्यायालयाला आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.जून२००३- या केसमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे म्हणत सलमानची उच्च न्यायालयात धावआॅक्टोबर २००३- सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.डिसेंबर २००३- सलनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो का? याचा निर्णय दंडाधिकाऱ्यांनीच घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.आॅक्टोबर २००६- सलमान खानविरुद्ध दंडाधिकाऱ्यांनी आरोप निश्चित केला.सलमानचा बॉडीगार्ड आणि या केसमध्ये सलमानविरुद्ध एफआयआर नोंदवणाऱ्या रवींद्र पाटील यांचा टी.बी. ने मृत्यू. सलमानवर कठोर कलमांतर्गंत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी कोर्टापुढे मागणी१७ साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.२४ जून २०१३- सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा निर्वाळा देत सत्र न्यायालयाने सलमानचा अर्ज फेटाळला. सत्र न्यायालयात खटल्यास नव्याने सुरुवात, पहिल्या साक्षीदाराने साक्ष नोंदविली.२४ जुलै २०१४- सत्र न्यायालयाने खटल्यास सुरुवात करत, आरोप निश्चिती केली.जुलै २०१४- वांद्रे पोलिस स्टेशनमधून सलमान खटल्यातील महत्त्वाच्या फायली गायब. सलमानविरुद्ध साक्ष देणाऱ्या ६३ जणांच्या साक्षीची फाईल हरवली. कोर्टाचे चौकशीचे आदेश.१२ सप्टेंबर २०१४- गहाळ फायली सापडल्या आणि कोर्टासमोर सादर करण्यात आल्या. सप्टेंबर २०१४- सलमाच्या खटल्यासाठी प्रदीप घरत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती.२५ मार्च २०१४- २४ साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर सरकारी वकिलांनी साक्षी-पुरावे नोंदवण्याचे काम पूर्ण केल्याचे जाहीर केले.27 मार्च2015अतिरिक्त सत्र न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी कलम सीआरपीसी ३१३ अंतर्गत सलमानची साक्ष नोंदवली.३१ मार्च २०१५- सलमानचा चालक अशोक सिंह बचावपक्षाचा साक्षीदार म्हणून न्यायालयासमोर हजर करण्यात आला. ‘त्या’ दिवशी सलमान गाडी चालवत नसून, आपणच गाडी चालवत असल्याची साक्ष सिंह याने न्यायालयाला दिली. १ एप्रिल २०१५- सरकारी वकिलांनी युक्तिवादाला सुरुवात केली.१० एप्रिल २०१५- सलमानच्या वकिलांनी युक्तिवादास सुरुवात केली.२० एप्रिल २०१५- दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला.२१ एप्रिल २०१५- सलमानच्या खटल्यावर ६ मे रोजी निर्णय देऊ, असे न्यायालयाने जाहीर केले.६ मे२०१५- न्यायालयाने सलमानला दोषी ठरवले, ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा, सलमानची हायकोर्टात धाव, अपील दाखल करून घेत, सलमानची जामिनावर सुटका.८ मे २०१५ - समलानच्या अपिलावरील सुनावणी सुरू९ मे २०१५ - उच्च न्यायालयाने सलमानच्या शिक्षेला स्थगिती देत, त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. ७ ते १० डिसेंबर २०१५ - उच्च न्यायालयाने केली निकाल वाचनास सुरुवात१० डिसेंबर २०१५ - सलमान खानची निर्दोष सुटका>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
सलमानच्या अश्रूंचा बांध फुटला
By admin | Updated: December 11, 2015 02:14 IST