शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृतीसह विविध योजनांचा प्रसारही आता शिक्षकच करणार; कामाचा ताण वाढणार!

By रेश्मा शिवडेकर | Updated: January 8, 2024 08:57 IST

परीक्षांच्या तोंडावर शिक्षकांना जुंपले कामाला

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचे, विद्यादानाचे काम करणे अपेक्षित असताना राज्यभरातील शिक्षकांना त्याऐवजी इतरच कामांना अधिक वेळ द्यावा लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. मतदार जागृतीचे उपक्रम, मराठा समाजातील कुटुंबांचे सर्वेक्षण आदी कामे शिक्षकांकडे सोपविण्यात आल्याने शिक्षकांचे पुढील १५ दिवस अशैक्षणिक कामांतच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दहावीच्या मुलांच्या सराव, पूर्वपरीक्षा, इतर मुलांच्या घटक चाचण्या, त्यांचा सराव अशी शैक्षणिक कामे तोंडावर असताना शिक्षकांना मात्र त्याऐवजी इतरच कामांना प्राधान्य द्यावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात नाराजीचे वातावरण आहे. अलीकडेच जळगावात तहसीलदारांनी बैठक घेऊन मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण आठवडाभरात पूर्ण करण्याचे आदेश दिल्याची माहिती एका शिक्षकाने दिली. आठवडाभरात एका शिक्षकाने किमान १०० कुटुंबांचे सर्वेक्षण करणे या कामात अपेक्षित आहे. आमच्या शाळेतील चारपैकी तीन शिक्षकांना या कामासाठी घेतल्याची माहिती अन्य शाळेतील एका शिक्षकाने दिली.

हे कामही करायचे‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन विविध प्रकारची माहिती भरण्यास शाळांना सांगण्यात आले आहे. ‘लॉग इन’ तयार करण्यापासून १०० गुणांचे ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन भाग शाळांना भरून द्यायचे आहेत. त्यात विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे उपक्रम, क्रीडा स्पर्धा, आरोग्य, गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व विकासाकरिता केले जाणारे प्रयत्न, शाळा परिसराची माहिती पीडीएफ स्वरूपात जोडायची आहे. हे काम शिक्षकांवरच येऊन पडले आहे.

परीक्षांच्या तोंडावर शिक्षकांना जुंपले कामाला

 ‘लोकमत’ने ७ जानेवारीच्या अंकात ‘१०वीच्या सराव परीक्षा तोंडावर, शिक्षकांची दांडी’ या मथळ्याखाली वृत्त देऊन विद्यार्थ्यांची होत असलेली शैक्षणिक परवड ऐरणीवर आणली. त्यानंतर अनेक शिक्षकांनी विविध शासकीय योजना, उपक्रमांसाठी शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याचे सांगितले.  यासोबत डिसेंबरपासून मतदार जागृतीचे काम शाळेत सुरू असून त्यासाठी किती प्रभातफेऱ्या काढल्या, रांगोळी,वक्तृत्त्व स्पर्धा घेतल्या याची माहितीही सरकारी अधिकाऱ्यांना सादर करावी लागत आहे.

कामांची यादी

 दोन दिवस सकाळी १० ते ६ ‘निपुण भारत’चे प्रशिक्षण ‘नवभारत साक्षरता अभियाना’साठी प्रशिक्षण आणि कामे पंतप्रधानांसमवेतच्या ‘परीक्षा पे चर्चा’साठी किमान ५० टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणीची सक्ती मराठा समाजातील कुटुंबांचे विस्तृत सर्वेक्षणाचे काम. एका शिक्षकाने किमान १०० जणांचे सर्वेक्षण करण्याची सक्ती ‘माझी शाळा, सुंदर शाळे’साठी ऑनलाइन माहिती सादर करणे मतदार जागृतीसाठी प्रभात फेऱ्या, रांगोळी, वक्तृत्त्व स्पर्धा घेणे

टॅग्स :Teacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र