शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

शिक्षक पती-पत्नींचा संसार नावालाच!

By admin | Updated: October 8, 2015 01:35 IST

लग्नानंतर १०-१५ वर्षे एकमेकांपासून दूर राहणाऱ्यांचा संसार केवळ नावालाच शिल्लक असतो. राज्यभरातील सुमारे १२ हजार शिक्षक दाम्पत्य बदलीच्या धोरणामुळे हा कटू अनुभव घेत आहेत.

- गजानन दिवाण,  औरंगाबादलग्नानंतर १०-१५ वर्षे एकमेकांपासून दूर राहणाऱ्यांचा संसार केवळ नावालाच शिल्लक असतो. राज्यभरातील सुमारे १२ हजार शिक्षक दाम्पत्य बदलीच्या धोरणामुळे हा कटू अनुभव घेत आहेत. वैयक्तिक आयुष्यच अधुरे असणाऱ्या या शिक्षकांकडून समाज बदलण्याची आशा तरी कशी ठेवायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकाच जिल्ह्यातील पती-पत्नीच्या शाळेतील अंतर ३० कि.मी.पर्यंत असावे, अशी अट आहे, परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यांत कार्यरत दाम्पत्याच्या शाळेतील अंतर किंवा त्यांची निश्चित सेवा झाल्यावर बदली व्हावी, अशी कुठलीही तरतूद नाही. त्याचा फटका राज्यातील सुमारे १२ हजार शिक्षक दाम्पत्यांना बसत आहे. त्यातील अनेक शिक्षक १० ते १५ वर्षे जोडीदारापासून दूर आहेत. त्यांच्या शाळांचे अंतर ९०० कि.मी.पर्यंत आहे. म्हणजेच महिन्यातून एखाद्या वेळीच त्यांची भेट होते. राज्यातील अशा ३८ दाम्पत्यांची यादी ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी व्यथा मांडली. ७, १०, १२ वर्षे झाली त्यांच्या लग्नाला, तरी संसार केवळ नावालाच उरला, अशा स्थितीत त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी ठेवणार, असा सवाल शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी उपस्थित केला. सध्याच्या स्थितीत आंतरजिल्हा बदली करवून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी समान जात वर्गाची अट मोठी अडचण ठरत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील शिक्षक तयार असले, तरी त्यांची जात एकच असणे आवश्यक आहे. तसा शिक्षक मिळणे किती कठीण आहे, हे प्रतीक्षा यादीवरील १३ हजार दाम्पत्यांच्या आकड्यावरून लक्षात येते.मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, हाती काहीच लागले नाही. नियमांमध्ये बदल करावा, म्हणून राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य रोस्टर एकच करण्याची त्यांची मागणी असून, राज्यात सरसकट एकच रोस्टर केल्यास रिक्त जागांवर तातडीने या दाम्पत्यांची वर्णी लागू शकते. सद्य:स्थितीत राज्यात शिक्षकांच्या १७ हजार जागा रिक्त आहेत. त्या भरण्यापूर्वी आंतरजिल्हा बदल्यांचा विषय मार्गी लावल्यास हा प्रश्नही मिटेल आणि नवीन भरतीदेखील करता येईल, अशी अपेक्षा पिट्टलवाड यांनी व्यक्त केली.त्यांना दिलासा; यांना मात्र प्रतीक्षाकौटुंबिक अडचण लक्षात घेता, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांच्या बदल्या अवघ्या दीड वर्षात रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने २८ आॅक्टोबर २०१३ ला घेतला. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या या शिक्षकांची अडचण कोणीच लक्षात घेत नसल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली.मागण्या काय?आंतरजिल्हा बदली करताना समान जात संवर्गाची अट रद्द करून उमेदवार ते उमेदवार बदली करण्यात यावी. राज्यातील रिक्त जागांवर प्राधान्याने या दाम्पत्यांचा विचार व्हावा. संस्थेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेत न करता, खासगी संस्थेतील रिक्त पदांवर करण्यात यावे.भरतीप्रमाणे आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.आंतरजिल्हा बदलीसाठीची पाच वर्षे सेवेची अट रद्द करून तीन वर्षे करावी.सुमारे १२ हजार शिक्षक दाम्पत्यांना बसत आहे. त्यातील अनेक शिक्षक १० ते १५ वर्षे जोडीदारापासून दूर आहेत.