शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

‘सेल्फी’ निर्णयावर शिक्षक घालणार बहिष्कार

By admin | Updated: November 7, 2016 01:28 IST

शालेय शिक्षण विभागाने महिन्याच्या दर सोमवारी विद्यार्थांचा सेल्फी काढण्याचा नुकताच घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये नाराजी आहे

बारामती : शालेय शिक्षण विभागाने महिन्याच्या दर सोमवारी विद्यार्थांचा सेल्फी काढण्याचा नुकताच घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये नाराजी आहे. हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यातील शिक्षकांची प्रमुख प्रातिनिधिक संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण विभागाने घेतलेला ‘सेल्फी’च्या निर्णयाला विरोध केला आहे. या शासन निर्णयावर संपूर्ण राज्यभर बहिष्कार घालण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार प्रत्येक सोमवारी वर्ग शिक्षकाने १० विद्यार्थांचा गट तयार करायचा आहे. या गटाचा स्वत:सोबत सेल्फी घेऊन तो सरल मध्ये ‘आॅन लाईन अपलोड’ करायचा आहे. विद्यार्थांचे आधार क्रमांकदेखील ‘अपलोड’ करण्याचे आदेश आहेत. या निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या निर्णयामुळे शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा नाहक वेळ वाया जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये नेटसाठी पुरेशी रेंज मिळत नसल्याने शिक्षकांना शाळा सोडुन जवळच्या मोठ्या गावी माहिती सरल प्रणालीत भरण्यासाठी जावे लागणार आहे. राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या विरोधात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार विद्यार्थी गळती, गैरहजेरीचा व सेल्फीचा संबंध येत नाही. ही माहिती सरलमध्ये भरण्यासाठी शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.शिक्षकांना सध्या विविध कामे करावी लागत आहेत. सरलमध्ये संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरणे, विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला आॅनलाइन देवाणघेवाण, शिक्षकांची माहिती आॅनलाईन भरणे, शाळेतील सर्व सोईसुविधांची माहिती, मध्यान्ह भोजन योजनेतील लाभार्थ्यांची माहिती रोजच्या रोज भरणे, इयत्ता ५ वी व ८ वी चे शिष्यवृत्ती अर्ज, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अर्ज, सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती अर्ज, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्ज, इस्पयार अवॉर्ड योजनेची माहिती, स्वच्छ भारत विद्यालय योजनेची माहिती, शिक्षकांची प्रशिक्षणाची माहिती, शिक्षकांचे वेतनासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आॅनलाईन वेतन मागविणे, आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच, सध्या शिक्षकांना आधीच अनेक प्रकारच्या माहिती आॅनलाइन भराव्या लागत आहेत. ही माहिती आॅनलाइन भरण्यासाठी शाळास्तरावर संगणक, विद्युत पुरवठा, तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ही सर्व कामे बाहेरून करून घ्यावी लागतात. शासनाने ४ टक्के सादील बंद केल्यामुळे या सर्व बाबीचा आर्थिक भुर्दंड मुख्याध्यापकास सहन करावा लागत आहे. या सेल्फीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध आहे. ही सेल्फिची सक्ती तत्काळ रद्द करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या परिपत्रकाच्या अंमलबजावणीवर बहिष्काराचा निर्णय शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व मार्गदर्शक प्रा.एस.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणिस खंडेराव ढोबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)