शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्याचे बंधन, शिक्षण निरीक्षकांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 04:03 IST

सेवासातत्य देताना टीईटी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट मुंबईतील शिक्षकांना घालण्यात आली आहे. मात्र, या अटीवर शिक्षक परिषदेने आक्षेप नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सेवासातत्य देताना टीईटी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट मुंबईतील शिक्षकांना घालण्यात आली आहे. मात्र, या अटीवर शिक्षक परिषदेने आक्षेप नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, शिक्षक निरीक्षकांचा निर्णय अन्यायकारक असून, तो तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून निवेदन दिले आहे. मुंबईतील शिक्षण निरीक्षकांच्या उत्तर विभागात सप्टेंबर २०१३ मध्ये अनेक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरती करण्यात आली होती. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये २०१३ पूर्वी शिक्षक कार्यरत होते. त्यांना सप्टेंबर २०१३ मध्ये शिक्षण सेवकांच्या मान्यता तत्कालीन शिक्षण निरीक्षकांनी दिल्या आहेत. त्या मान्यता पत्रात या शिक्षकांच्या मूळ नियुक्त्या २०१३ पूर्वीच्या असल्याचेही दाखविले असल्याने या शिक्षकांना टीईटी लागू होत नाही, तसेच शिक्षण निरीक्षकांनी शिक्षण सेवक पदाची मान्यता देताना टीईटीबाबत कोणतीही अट टाकली नव्हती. त्यामुळे आता सेवासातत्य देताना टीईटी उत्तीर्ण करण्याबाबतची व टीईटी उत्तीर्ण न केल्यास सेवासमाप्त करण्याची शिक्षण निरीक्षकांची कृती नियमबाह्य असल्याचा दावा बोरनारे यांनी केला आहे.शिक्षण सेवकांना ३ वर्षे पूर्ण झाल्यावर समाधानकारक सेवा केल्याचे शाळेकडून प्रमाणपत्र दिले की, तो शिक्षण सेवक नियमित वेतनश्रेणीस पात्र होतो. याबाबत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ९ एप्रिल २००३ रोजी शासन निर्णयही निर्गमित केला आहे. त्यात सेवासातत्य देण्यासंदर्भात शिक्षण अधिकाºयांना मार्गदर्शन केले आहे, तरीही शिक्षण निरीक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्याची नियमबाह्य अट टाकली आहे. त्यामुळे तातडीने अट मागे न घेतल्यास या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकeducationशैक्षणिक