शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 06:44 IST

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या चार जागांसाठी कोणाला मिळणार संधी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाने बुधवारी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच  मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर केली. या चार जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होत आहे. १३ जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. ४ जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाठोपाठ विधानपरिषदेची निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.

विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४  रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत. 

निवडणुकीचा कार्यक्रम १५ मे : अधिसूचना. २२ मे : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत. २४ मे : छाननी. २७ मे : अर्ज मागे घेण्याची मुदत. १० जून : सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान. १३ जून : मतमोजणी व निकाल

नावांवरून रंगणार चर्चा nमुंबई पदवीधर : उद्धवसेनेकडून विलास पोतनीस यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. nमुंबई शिक्षक : विद्यमान आमदार कपिल पाटील हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यामुळे आघाडीकडून पाटील हेच उमेदवार असू शकतात. nनाशिक शिक्षक : ही जागा उद्धवसेनेकडून लढवली जाईल. महायुतीत जागावाटप झाल्यानंतरच उमेदवार जाहीर केले जातील. nकोकण पदवीधर : ही जागा लढविण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. गेल्यावेळी ही जागा शिवसेनेने लढवली होती. त्यामुळे यावरून उद्धवसेना-काँग्रेस सामना रंगू शकतो. येथे भाजप पुन्हा निरंजन डावखरेंना संधी देऊ शकते. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक