शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019 : पुन्हा उठता आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने पाकिस्तानचे कंबरडे मोडा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:25 IST

पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडले पाहिजे जेणेकरून त्यांना पुन्हा उठता येणार नाही, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली

मुंबई - गेल्या आठवड्यात झालेल्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याचे दु:ख आपल्या सर्वांच्या मनात आहे. आता या हल्ल्याचा कशा प्रकारे बदला घेतला जातो, याची वाट देशवासीय पाहत आहेत. पाकिस्तान हा सुधरणारा नाही त्यामुळे पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडले पाहिजे जेणेकरून त्यांना पुन्हा उठता येणार नाही, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एनएससीआय डोम येथे आयोजित लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी व्यक्त केली.  उद्धव ठाकरे उपस्तितांना संबोधित करताना म्हणाले, ''युतीबाबत काय बोलायचे, विरोधकांना काय उत्तर द्यायचे हे इतर ठिकाणी पाहू. येथे मी राजकारणावर काही भाष्य करणार नाही. गेल्या आठवड्यात पुलवामा येथे आपल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या दु:खाची झालर या कार्यक्रमावरही आहे.  आता या हल्ल्याचा कशा प्रकारे बदला घेतला जातो, याची वाट देशवासीय पाहत आहेत. पाकिस्तान हा सुधरणारा नाही त्यामुळे पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडले पाहिजे जेणेकरून त्यांना पुन्हा उठता येणार नाही,''  दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत पक्षाला योग्य दिशा दाखवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवारी मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.    

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे सहावं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. शिवसेना पक्षप्रमुखपदाची धुरा सांभाळताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे कुशलपणे नेतृत्व केले आहे. तसेच कठीण काळामध्ये पक्षाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे. एकीकडे सत्तेत असतानाच शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्वावर सरकारला धारेवर धरण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. नुकत्याच झालेल्या शिवसेना आणि भाजपा युतीच्यावेळीही त्यांनी जनतेच्या हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य मिळेल, अशी भूमिका घेतली होती. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना यावर्षीचा लोकमत पॉवर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. 

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान