शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना चक्रीवादळाचा मोठा तडाखा; अनेक जिल्ह्यांत झाडे कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 06:48 IST

घरांचेही नुकसान, कणकवलीसह कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत शनिवारी मध्यरात्री धडकलेल्या ‘तौक्ते’ वादळाने मुसळधार पावसासह धुमाकूळ घातला. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने समुद्र खवळला असून, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रात्रीपासून वादळी वाऱ्याने दोन्ही जिल्ह्यांत ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली, तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कणकवलीसह कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. सावंतवाडी तालुक्यात ठिकठिकाणी घरांवर झाडे कोसळली असून, अनेक मुख्य मार्गांवरही झाडे पडल्याने मार्ग बंद झाले आहेत. आंबोली घाटमार्गावर दरड, तसेच झाडे कोसळण्याचे प्रकारही सुरू आहेत. वैभववाडी तालुक्यात १०० हून अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समुद्र किनारपट्टीला वादळाचा जाेरदार तडाखा बसला. किनारपट्टीतील आंबाेळगड, मुसाकाझी, आवळीचीवाडी या भागातील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, तर रत्नागिरी तालुक्यात सायंकाळी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी दिवसभर वादळी वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. 

कोल्हापुरात जोरदार वारे, पावसाने झोडपलेकोल्हापुरात जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. वाहतूक खोळंबली, वीजप्रवाहदेखील खंडित झाला. दुपारनंतर संततधार पावसाने झोडपून काढले. सांगली, मिरज शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून विद्युत तारांचे व घरांचेही नुकसान झाले.

पश्चिम वऱ्हाडात वाऱ्यासह पाऊसपश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. ग्रामीण भागामध्ये घरांवरील टिनपत्रे उडाली. झाडे कोसळली व वीज पुरवठा खंडित झाला. वर्धा शहरासह सेवाग्राम, पवनार, समुद्रपूर, सेलू, घोराड, सिंदी रेल्वे भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

पुणे शहरात ४० झाडे कोसळलीपुणे शहरात सायंकाळी सात वाजेपर्यंत वेगवान वाऱ्यामुळे ४० झाडे पडली. बारामती येथे महावितरणचे खांब कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, तर खेड तालुक्यात ८७ घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ