मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्स कंपनीने ‘ट्रस्ट आॅफ इंडिया’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून टाटा कंपनीच्या वाहनांवर कॅश डिस्काउंट्स तसेच वाहनांना वॉरंटीचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांसह राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनादेखील मिळणार आहे. टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारेख यांनी उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रत्येक सरकारी कर्मचारी आणि अधिकारी प्रयत्नशील असतो. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ऋणानुबंध जोडण्यासाठी टाटा मोटर्स कंपनीने हा उपक्रम सुरू केला आहे. जेणेकरून भविष्यातदेखील राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांनी तत्पर राहावे, यासाठी टाटा मोटर्सकडून त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. टाटा मोटर्सच्या सर्व प्रवासी वाहनांवर या उपक्रमांतर्गत लाभ घेता येईल. (वाणिज्य प्रतिनिधी)
टाटा मोटर्सचा ‘ट्रस्ट आॅफ इंडिया’ उपक्रम
By admin | Updated: July 4, 2016 02:30 IST