शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

2019 मध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे लक्ष्य - राम शिंदे

By admin | Published: July 11, 2017 5:45 PM

लोकमत वॉटर समिट 2017 मध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये बोलताना जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जलसंधारण क्षेत्रात वेगाने काम सुरु असल्याचे सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11- लोकमत वॉटर समिट 2017 मध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये बोलताना जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जलसंधारण क्षेत्रात वेगाने काम सुरु असल्याचे सांगितले. लोकमत’ मीडियाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यांनी राम शिंदेंना जलसंधारण आयुक्तालयासाठी आपण काय करताय ? हा प्रश्न विचारला. 
 
त्यावर त्यांनी जलसंधारणासाठी 25 वर्षे आस्थापना नव्हती. आता या सरकारमध्ये त्यावर वेगाने काम सुरु आहे. औरंगाबादला आयुक्तालयासाठी प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले. 
 
राम शिंदेंना जलयुक्त शिवारची सध्याची स्थिती काय? हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जलयुक्त शिवार योजनेचा फायदा लोकांना झाला. प्रशासकीय पातळीवर काम वेगाने सुरु आहे. 2019 मध्ये टंचाईमुक्त, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे आमचे लक्ष्य आहे ते आम्ही साध्य करुच असे त्यांनी सांगितले. 
 
या समिटमध्ये बोलताना त्यांनी लोकमत समूहाचे कौतुक केले.  लोकमत समूह सामाजिक बांधिलकी जपणारा समूह आहे. जनसामान्यांचा आवाज म्हणजेच लोकमत अशा शब्दात त्यांनी लोकमतच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी लोकमतच्या जलयुक्त शिवाराच्या कामाचेही कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील जलयुक्त शिवारचे कौतुक केले आहे. 
 
आणखी वाचा 
राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण - राजेंद्र सिंह
शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पूर यांचा जवळचा संबंध - संजीव मेहता
कर्जमाफी नव्हे कायमचे कर्जमुक्त करायचेय - गिरीष महाजन
 
प्रथमच शेतीचा विचार गांभीर्याने करण्याच आला आहे. जलयुक्त शिवारमुळे राज्यात क्रांती झाली. जलयुक्त शिवार ही लोक चळवळ आहे. जलयुक्त शिवारासाठी लोकांनी भरपूर मदत केली. जनसामान्यांनी जलयुक्त शिवरासाठी 540 कोटी उभे केल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले, की राज्यातील दुष्काळी भागात पाणीपुरवणा करण्यासाठी साडेचार हजार टँकरची गरज असते पण जलयुक्त शिवराच्या कामानंतर ती संख्या 700 वर आली आहे.
 
जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज लोकमत वॉटर समिट 2017चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन करण्यात आले. तर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांची या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती आहे.
 
लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकमतच्या वाचकांचे आभार मानले. जलदूतांच्या जलकथांना राज्यातील लोकमतच्या वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, जलसंधारणाची राज्याला, मराठवाड्यासारख्या भागांना अतीव गरज आहे. 
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचे आहे, इस्रायलचे उदाहरण जगाने समोर ठेवावे. जलयुक्त शिवारचे यश महत्त्वाचे, पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणावा. यावेळी बोलताना त्यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या कामाचा गौरवही केला. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना भारतातील पाण्याची स्थिती आण जलयुक्त शिवाराचे काम का गरजेच आहे याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जगातील पाण्याची उपलब्धता दोन हजार वर्षांपूर्वी जेवढी होती, तेवढीच आजही आहे, पण लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे पाणी नियोजन महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही.