शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज लातूरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 20:29 IST

मराठवाड्यातील सर्वात उंच १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलावर शानदार सोहळ्यात शिक्षण तथा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. 

लातूर  - मराठवाड्यातील सर्वात उंच १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलावर शानदार सोहळ्यात शिक्षण तथा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी जिल्ह्यातील ११ हजार ५२० विद्यार्थ्यांनी भव्य मैदानावर तिरंगा साकारत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. विक्रम काळे, आ. विनायकराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, जि.प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, महापौर सुरेश पवार, माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर, वर्षा तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाकडे पाहून नागरिकांना सैन्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण होऊन त्यांच्या प्रती उत्तरदायित्वाची भावना जागृत होईल, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले. तर पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, हा मराठवाड्यातील सर्वात उंच ध्वज आहे. तो उभारण्यासाठी सर्व लातूरकरांचा सहभाग मोलाचा आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अगदी कमी वेळेत राष्ट्रध्वजाच्या उभारणीला मंजुरी मिळवून जलदगतीने काम पूर्ण केल्याबद्दल मंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.  शिक्षणमंत्री तावडे, पालकमंत्री निलंगेकर व एका शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करून राष्ट्रध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील २० शाळांमधील व जिल्हा परिषद शाळांमधील हजारो विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :Indiaभारतlaturलातूर