शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस, सहका-यांशी सभ्यतेने बोला, वरिष्ठ अधिका-यांना पोलीस आयुक्तांची तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 21:27 IST

आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले सहकारी अधिकारी, अंमलदारांशी सौजन्य व सभ्यतेने वागावे, अन्यथा त्याबाबत तक्रार आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांना दिला आहे.

मुंबई : आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले सहकारी अधिकारी, अंमलदारांशी सौजन्य व सभ्यतेने वागावे, अन्यथा त्याबाबत तक्रार आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांना दिला आहे. विशेषत: महिला अधिकारी, पोलिसांशी संभाषण करताना विशेष खबरदारी बाळगण्याची सूचना दिली आहे.मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अप्पर आयुक्त, उपायुक्त, उपअधीक्षक, वरिष्ठ निरीक्षक हे आपल्या कनिष्ठ सहका-यांशी संभाषण करताना अधिकार गाजवित मग्रुरी, अरेरावी, शिवराळ भाषा वापरतात, विशेषत: महिला अधिकारी, कर्मचा-यांशी अश्लील व शिवराळ भाषा वापरतात. त्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळूनही शिस्तीच्या बडगा व आणखी त्रास होण्याच्या भीतीमुळे त्याबाबत उघडपणे तक्रार करीत नाहीत. मात्र त्यामुळे संबंधितांचे मानसिक खच्चीकरण झाल्याने काम करताना अडचणी निर्माण होतात. ही बाब निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्तांनी आपल्या कनिष्ठ सहकारी, महिला अधिकारी, अंमलदारांशी सौजन्याने बोलण्याचे फर्मान बजाविले आहे.----------सोशल मीडियावरील पोस्टचा परिणामघाटकोपर वाहतूक नियंत्रण शाखेतील वरिष्ठ निरीक्षक उबाळे हे एका महिला पोलिसांशी अंत्यत शिवराळ भाषेत संभाषण करीत असल्याची एक आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल झाली आहे. त्याबाबत संबंधितांवर काहीच कारवाई न झाल्याने एका अंमलदाराने ती फेसबुक व व्हॉटस्अपवरून व्हायरल केली. त्यानंतर उबाळे यांना कारणे दाखवा नोटीस तसेच वरिष्ठांनी सहका-यांशी सभ्यपणे बोलण्याचे फर्मान आयुक्तांनी बजाविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसMumbai policeमुंबई पोलीस