शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

अमेरिकेची बाजू घेणे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांसाठी घातक

By सुनील चरपे | Updated: April 3, 2025 04:48 IST

Donald Trump Tariffs Announcement: भारतासह अन्य देशांनी अमेरिकन शेतमाल व इतर वस्तूंवरील आयात शुल्क कमी करावा, यातून त्यांच्या शेतमालाची निर्यात वाढावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून जागतिक पातळीवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत.

- सुनील चरपेनागपूर  - भारतासह अन्य देशांनी अमेरिकन शेतमाल व इतर वस्तूंवरील आयात शुल्क कमी करावा, यातून त्यांच्या शेतमालाची निर्यात वाढावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून जागतिक पातळीवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. भारतीय अर्थतज्ज्ञ व नाेकरशाह अमेरिकेची बाजू घेत आहेत, हे भारतीय शेती क्षेत्र व शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक ठरणार आहे, असे परखड मत कृषी अर्थतज्ज्ञ देवेंद्र शर्मा यांनी व्यक्त केले.

भारतातील डेअरी उद्योग धोक्यात येईलभारताने अमेरिकेच्या वाशिंग्टन ॲपल, दुग्धजन्य पदार्थ, साेयाबीन, खाद्यतेल, अक्राेड व चिकन यासह इतर शेतमालावरील आयात शुल्क कमी करण्यासाठी दबाव निर्माण करीत आहे.  याचे काही अर्थतज्ज्ञ व नाेकरशाह समर्थन करीत आहे. भारताने आयात शुल्क हटविल्यास डेअरी व पाेल्ट्री उद्याेगासाेबत शेती क्षेत्र धाेक्यात येईल.

२६ लाख सबसिडीअमेरिका प्रतिशेतकरी २६ लाख रुपये सबसिडी देत असून, भारतीय शेतकऱ्यांना पीएम किसान निधीच्या रूपाने वर्षाकाठी सहा हजार रुपयांची सबसिडी दिली जाते. अमेरिका त्यांच्या कापूस उत्पादकांना दरवर्षी एक लाख डाॅलरची सबसिडी देते, तर भारतात ती २७ डाॅलर एवढी आहे.

अमेरिकेचा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा डाेनाल्ड ट्रम्प यांच्या मते, भारत त्यांच्या शेतमालाच्या आयातीवर सरासरी ३७.५ टक्के, तर अमेरिका भारतीय शेतमालाच्या आयातीवर सरासरी ५.३ टक्के आयात शुल्क आकारते. हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे. भारत अजूनही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने मंजूर केलेल्या टॅरिफचे पालन करीत असून, अमेरिका वारंवार उल्लंघन करीत आहे. अमेरिकेने भारताविरुद्ध नऊ हजार नाॅन टॅरिफ लावले आहे, तर भारताचे अमेरिकेविरुद्ध ६०९ नाॅन टॅरिफ लावले आहे. असे असूनही त्यांची ६० टक्के निर्यात प्रभावित झाली आहे, असे देवेंद्र शर्मा यांनी सांगितले. 

प्रत्येक वेळी शेतीक्षेत्रानेच त्याग का करावा? आज भारतीय शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. सबसिडीअभावी भारतीय शेतकरी अमेरिकन शेतकऱ्यांशी स्पर्धा करू शकत नाही. भारताला अमेरिकेच्या कुठल्याही शेतमालाची गरज नाही. भारताने अमेरिकेसमाेर गुडघे टेकून शेती व शेतमालावर आधारित उद्याेग धाेक्यात आणू नये.  - देवेंद्र शर्मा, कृषी अर्थतज्ज्ञ

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिकाmilkदूध