शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखांची रोेकड घेताना ठाण्याच्या तहसीलदारासह चालकही जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 22:14 IST

जमीन अकृषिक दाखवून त्यापोटी कर भरण्याचे आदेश काढण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल दहा लाखांची रोकड आपल्या चालकामार्फत स्वीकारणारे ठाणे तहसीलदार किसन भदाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

ठाणे: जमीन अकृषिक दाखवून त्यापोटी कर भरण्याचे आदेश काढण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल दहा लाखांची रोकड आपल्या चालकामार्फत स्वीकारणारे ठाणे तहसीलदार किसन भदाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी चालकासह त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाण्यातील या तक्रारदाराने आपले काम करून घेण्याकरिता भदाणे यांच्याशी एक आठवड्यापूर्वी संपर्क साधला होता. मात्र, त्यासाठी दहा लाखांच्या एकरकमी लाचेची मागणी भदाणे यांनी केली होती. याबाबत संबंधितांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ११ आॅक्टोबर रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस निरीक्षक वैशाली रासकर यांनी खात्री केली. त्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ही रक्कम देण्याचे ठरवून तसा सापळा लावण्यात आला.मंगळवारी ठाणे तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच भदाणे यांच्या कारचा चालक राम उगले याला ही दहा लाखांची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारतांना पकडण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. तहसिलदारसारख्या वर्ग एकच्या अधिका-याला लाच स्वीकारतांना पकडण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :thaneठाणे