शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेताय, सावधान!

By संतोष आंधळे | Updated: May 15, 2023 10:45 IST

गुगलवरील ठगांमुळे वडाळा येथील वकील महिलेला रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी सव्वा लाख रुपये गमाविण्याची वेळ ओढवली. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

गेल्या काही महिन्यांत मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांत रुग्णांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहेत. रुग्ण थेट डॉक्टरांची किंवा रुग्णालयात ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यासाठी वेबसाइटवरून बुकिंग करतात, तेव्हा रुग्णांना हजारो रुपयांचा गंडा घातला जाताे. 

गुगलवरील ठगांमुळे वडाळा येथील वकील महिलेला रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी सव्वा लाख रुपये गमाविण्याची वेळ ओढवली. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

काही दिवसांपूर्वी कांदिवली येथील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मीरा रोड येथील रुग्णालयात ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करताना ९७ हजार रुपयांना चुना लागला.

कशी होते फसवणूक -रुग्णालयाच्या डुप्लिकेट वेबसाइट बनविल्या जातात. त्यामध्ये गुन्हेगार आपली स्वतःची माहिती देऊन रुग्णांकडून पैसे उकळतात.

रुग्ण गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधून अपॉइंटमेंट घेतात. अपॉइंटमेंट बुक केल्याचे सांगून ५ रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले जाते. व्हॉटस्ॲप क्रमांकावर टोकन क्रमांक ३ असा मेसेज पाठवून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर ठगाने पाठविलेल्या लिंकनुसार व्यवहार केले जातात. 

हे खूप गंभीर आहे. या अशा स्वरूपाच्या दोन घटना आमच्याकडे घडल्या आहेत. त्या आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. आम्ही जनजागृती अभियान राबवत आहोत. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा वापर करून आमच्या रुग्णालयाची वेबसाईट कशी दिसेल, यासाठी प्रयत्न करत असतो. रुग्णांनीसुद्धा अपॉइंटमेंट घेताना सतर्क राहण्याची गरज आहे.  - जॉय चक्रवर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंदुजा हॉस्पिटल

रुग्णांची फसवणूक होते याबद्दल आम्हाला कल्पना आहे. मात्र, आमची आयटीची टीम आमच्या वेबसाइटवर सातत्याने लक्ष ठेवून असते. कुणीही रुग्णालयाची साइट हॅक करू शकत नाही. विशेष म्हणजे आम्ही आमच्या वेबसाइटमध्ये आणखी बदल करणार असून, त्यावर सध्या काम सुरू आहे. लवकरच पूर्ण वेबसाइट तुम्हाला बदललेली दिसेल.- विवेक तलवलीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लोबल हॉस्पिटल

टॅग्स :doctorडॉक्टरonlineऑनलाइन