शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

‘टेकआॅफ’ की नव्या समस्यांचे ‘लँडिंग’?

By admin | Updated: October 17, 2016 01:19 IST

पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार ही विकासाची मोठी संधीच चालून आलेली आहे.

बी. एम. काळे,

जेजुरी- पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार ही विकासाची मोठी संधीच चालून आलेली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्याचे जागतिक महत्त्व अधोरेखित होणार आहे. मात्र, विमानतळ होणार, याच घोषणेने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे या पुढील काळात विमानतळ विषयामध्ये एक सुस्पष्ट पारदर्शकता आणि नियोजनबद्ध प्रस्ताव आखणी गरजेचा आहे. विमानतळाचे टेकआॅफ होताना नव्या समस्यांचे ह्यलँडिगह्ण होणार नाही, याची काळजी शासनाला घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने विमानतळसंदर्भातील वस्तुस्थिती येथील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांसामोर मांडणे गरजेचे बनले आहे. विमानतळासाठी नेमकी किती जमीन लागणार आहे. तिचे भूसंपादन नेमके कसे केले जाणार आहे. यातून ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, त्यांना नेमका किती व कोणता फायदा होणार आहे, हे याच विभागाने सक्षम अधिकारीमार्फत मांडणे गरजेचे आहे. अन्यथा केवळ राजकारण आणि गैरसमाजातून आलेली संधी हुकण्याची आणि विमानतळाला विरोध वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच सात गावांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा ही या विरोधाची नांदी म्हणावी लागेल. इंचभरही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. >ढवळले राजकीय वातावरण तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे विमानतळ मीच आणल्याच्या अविर्भावात येथील शेतकऱ्यांना तारांकित हॉटेल्सची स्वप्ने दाखवत आहेत. अशातच जमिनी खरेदी-विक्री दलालांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. जमीनमालकांची भाषाही बदलली आहे.>जागेचा निर्णय अधांतरीपुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातून आता पुरंदर तालुक्यात करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली. तालुक्यात हे विमानतळ कोठे होणार आहे, हे मात्र अजूनही अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाही. केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने तालुक्यातील तीन ठिकाणचा सर्वे केला आहे. यात पारगाव परिसर, राजेवाडी, आंबळे परिसर आणि रिसेपिसे, राजुरी परिसर येथील पाहणी केली होती. जेजुरी परिसराची पाहणी केल्याची चर्चा होती. यापैकी सोयीची जागा विमान वाहतूक विभागाकडून नक्की होणार आहे. ती अजून नक्की झालेली नाही. याबाबत तालुका महसूल विभागाकडेही कोणतीच अधिकृत माहिती नाही. >धास्ती कायम राजेवाडी : पुरंदर तालुक्यातील सात गावात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आंतरराष्टीय विमानतळ उभारला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे, असे राजेवाडीचे माजी सरपंच रामदास जगताप व आदर्श शेतकरी विलास कडलग यांनी सांगितले. राजेवाडी, आंबळे, वाघापुर, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपुर या सात गावातील सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सातही गावातील शेतकरी महिलांनी विरोध केला होता त्या वेळी शिवतारे यांनी तुमचा विरोध असेल तर विमानतळ होणार नाही असे सांगितले होते तरी सुध्दा विमानतळाबाबत ते आग्रही का असा सवालही जगताप यांनी केला. आमची घरे जाळून तालुक्याचा विकास करु नका आम्हाला फक्त पुरंदर उपसाचे नियमित पाणी द्या आमच्या गावांचा विरोध कायम राहणार असल्याचे विलास कडलग यांनी सांगितले.>जिवापाड जपलेल्या जमिनींचे काय?पुणे जिल्ह्यात पुरंदरने कायमस्वरूपी दुष्काळाचे चटके अनुभवले आणि सोसले आहेत. अशा परिस्थितीत पुरंदर तालुक्यात विमानतळ होणे हे खरोखरंच पुरंदरचे भाग्य समजावे लागेल. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही जिवापाड जपलेल्या जमिनी देऊन येथील शेतकऱ्यांचे भविष्य काय? हा प्रश्न मात्र पुरंदरकरांसमोर आहे. पुरंदर जागतिक दळणवळणाचे एक केंद्र बनणार असले, तरी ज्यांच्यामुळे हे होणार आहे, त्यांचा विचार सर्वप्रथम होणार का? हा प्रश्न अद्याप तरी अधांतरी आहे.