शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील कोणीही 'स्मार्ट कार्ड' घ्या आणि एसटीने प्रवास करा- दिवाकर रावते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:11 IST

'कॅशलेस स्मार्ट कार्ड' योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी केली आहे.

मुंबईः विशिष्ट रक्कम भरून घेतलेले स्मार्ट कार्ड आपल्या बरोबरच कुटुंबातील व्यक्ती व इतरांनाही प्रवासासाठी वापरता येईल, अशी सुविधा देणारी 'कॅशलेस स्मार्ट कार्ड' योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी केली आहे.या योजनेंतर्गत प्रवाशांना रु.50/- चे स्मार्ट कार्ड घेऊन त्यावर सुरुवातीला किमान रु.500/- इतकी रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्भरणा रक्कम ही रु.100/- च्या पटीत असेल. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून (1 मे, 2018) प्रत्येक आगारात जाऊन घेता येईल. एसटीच्या प्रवासाला निघाले की, सुट्टे पैसे आहेत का? नेमके पैसे द्या, किती जणांना मी मोड देऊ! असे वाहकाचे नानाविध प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात.या सर्वातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. त्यानुसार ठरावीक रकमेचे स्मार्ट कार्ड घेऊन त्याद्वारे त्या रकमेइतका एसटीचा कोणताही (साधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी व अश्वमेध बसेस) प्रवास करणे आता प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची चिंता करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हे स्मार्ट कार्ड एका व्यक्तीने काढले तरी त्याच्या कुटुंबातील व मित्रांपैकी कोणीही प्रवासाला जाताना हे कार्ड वापरू शकतात. तसेच कितीही व्यक्तींची तिकिटे काढू शकतात.अर्थात प्रत्येक व्यक्तीने जितका प्रवास केला तितके पैसे त्या कार्डमधून वजा होत राहतील. हे कार्ड नंतर पुनर्भरणा (रिचार्ज) करण्याची सुध्दा सोय असून, घरबसल्या देखील ऑनलाईन रक्कम या कार्डवर भरणा केली जावू शकते. सहाजिकच या स्मार्ट कार्ड मुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर तर होईलच, शिवाय सुट्ट्या पैशावरून वाहक व प्रवासी यांच्यातील हमरी-तुमरी व अनावश्यक वाद-विवाद देखील टाळले जाऊ शकतात.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेShiv Senaशिवसेना