मुंबई : काँग्रेसच्या वाट्याच्या रिक्त जागा भरून मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार होता. परंतु नावांच्या बाबतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यातील तीव्र मतभेद तसेच त्यावर तोडगा काढण्यात दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना आलेले अपयश यामुळे शपथविधीचा सोहळाच रद्द करण्याची वेळ आली. पण या नामुष्कीवर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरा कमालीच्या नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या आणि सोमवारी सकाळी अधिवेशन सुरू होण्याआधी अमित देशमुख व अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांचा शपथविधी करण्याचे निश्चित झाले. वास्तविक शपथविधीसाठी सायंकाळी चार वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावे असे निरोप गेले. सुटीचा दिवस असतानाही सगळे अधिकारी राजभवनावर हजर झाले. तयारी सुरु झाली आणि अचानक सायंकाळी शपथविधीचा कार्यक्रम होणार नाही, असे निरोप गेले. महाराष्टÑाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदा घडली. विरोधकांनी ही टिंगल असल्याची टीका केली आणि एकूणच घटनाक्रमाने सरकारचे हसे झाले. राष्ट्रवादी स्वत:पुरते निर्णय वेगाने घेत असताना काँग्रेसची कोणतीही यादी निश्चितच होत नव्हती. आधी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दिल्लीला जाऊन आले. निर्णय होत नव्हता. राष्टÑवादीने आव्हाडांना शपथ देण्याचा कार्यक्रम ठरवला म्हणून दिल्लीची बैठक सोडून मुख्यमंत्री मुंबईत आले, शपथविधीला हजर राहिले. खरीपाची बैठक करुन पुन्हा ते दिल्लीला गेले. माणिकराव, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश आणि मुख्यमंत्री यांच्यात एकवाक्यता होत नव्हती. किंबहुना कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि चव्हाण, ठाकरे व मोहन प्रकाश यांच्या एकत्रित बैठकीतूनही मार्ग निघाला नाही. माणिकराव ठाकरेंनाच प्रदेशाध्यक्ष पदावरुन बदला, अशी मागणीदेखील पुढे आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन प्रकाश यांनी माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निकटवर्ती पुण्याचे रमेश बागवे यांच्या नावाचा आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांची त्या नावाला पसंती नव्हती. सुनील केदार यांचेही नाव पुढे आले, पण बँक घोटाळ्यात त्यांचे नाव असल्याचे सांगण्यात आले. बाबा सिद्दीकी व विजय वडेट्टीवार या माजी राज्यमंत्र्यांची नावेही चर्चेत आली. निवडणुका काही महिन्यावर आलेल्या असताना
शपथविधीचा मार्ग मोकळा
By admin | Updated: June 2, 2014 05:09 IST