शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात न्या, बक्षीस मिळवा, केंद्र शासनाची योजना : १५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 12:46 IST

Central Government News: अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल होईपर्यंत जखमींना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. वेळेत उपचार न झाल्यामुळे जखमींचे मृत्यू वाढतात.  

- राम शिनगारेऔरंगाबाद : अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल होईपर्यंत जखमींना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. वेळेत उपचार न झाल्यामुळे जखमींचे मृत्यू वाढतात.  हे टाळण्यासाठी अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी नागरिकांनी पुढे येऊन तासाभरात त्यांना रुग्णालयात पोहोचवावे. ही नि:स्वार्थ मदत केल्याबद्दल संबंधिताला पाच हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असून,  त्याची अंमलबजावणी १५ ऑक्टोबरपासून होणार असल्याची अधिसूचना केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने काढली आहे. बिहारमध्ये २०१८ पासून अपघातात जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तीला ५ हजार रुपये बक्षीस देण्याची योजना राबविण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर ही योजना देशभर लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. जखमींना तत्काळ उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असल्याचा निष्कर्ष पाहणीतून दिसला.  अपघातानंतर तासाभरात जखमीला रुग्णालयात पोहोचून त्याच्यावर उपचार सुरू झाल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता बळावते.  जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी  स्वयंस्फूर्तीने मदत करणाऱ्यांची संख्या वाढावी, रुग्णाचे प्राण वाचावे म्हणून ५ ते १० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.  

प्रधान सचिवांना पाठविले पत्रभारतीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून ही योजना १५ ऑक्टोबरपासून देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी ३१ मार्च २०२६ पर्यंत     असणार आहे. 

तासाभरात मदत  मिळाल्यास जीव वाचतीलशरीरात पाच लिटर रक्त असते. अपघातात रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो. रक्तस्राव अधिक झाल्यामुळे बहुतांश रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे जेवढे लवकर अपघातग्रस्तावर उपचार सुरू होतील, तेवढा त्या रुग्णांचा जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. डोक्याला मार लागलेला असेल, तर त्यावर वेळीच उपचार सुरू झाले पाहिजेत. तासाभराच्या आत मदत मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचविण्याचे प्रमाण नक्कीच वाढेल. चौकशीचा ससेमिरा लागेल म्हणून अनेकजण मदतीला पुढे येत नाहीत. मदत करणाऱ्यांना पाच हजार रुपये देण्याची योजना स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे (घाटी) अधीक्षक डॉ. काशीनाथ चौधरी यांनी व्यक्त केली. 

केंद्र शासनाची अधिसूचना निघाली असल्याचे समजले. त्यानुसार राज्य शासनाने काही निर्देश दिल्यास त्याची कडकपणे अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करेल.- शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :AccidentअपघातCentral Governmentकेंद्र सरकार