शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची काळजी घ्या, अन्यथा कारवाई! ST प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये...

By सचिन देव | Updated: August 21, 2023 12:31 IST

एस. टी.च्या महाव्यवस्थापकांंची राज्यभरातील विभाग नियंत्रकांना तंबी

सचिन देव, लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे: प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी एसटीच्या सर्व बसेसला वायपर, हेड लाइट्स, तसेच इतर तांत्रिक कामे पूर्ण करून बसेस सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असताना अधिकाऱ्यांकडून दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याची बाब महामंडळाच्या महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना  पत्र पाठवून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही दिली आहे.

एस. टी. महामंडळाच्या यांत्रिक विभागाचे महाव्यवस्थापक नं. शि. कोलारकर यांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पावसाळ्याच्या आधी विभाग नियंत्रकांनी व यंत्र अभियंता यांनी त्यांच्या विभागातील प्रत्येक बसेसला वायपर बसवून घ्यावेत, तसेच हेड लाइट्स, साईट मिरर, गळक्या बसेसची दुरुस्ती, आदी तांत्रिक कामे तातडीने करण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, या सूचनांचे बहुतांश विभाग नियंत्रकांनी व यंत्र अभियंत्यांनी आपल्या विभागामध्ये पालन केलेले दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाशांकडून थेट वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून बसेस सुस्थितीत ठेवण्याबाबत सूचना करूनही, अधिकारी सूचनांचे पालन करीत नसतील, तर ही बाब अति गंभीर स्वरुपाची आहे. अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा आल्या, तर या तक्रारींची एस. टी. महामंडळाकडून गंभीर दखल घेण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :state transportएसटी