शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मजूर,बेघर, शोषितांची अन्न,औषधांसह सर्व काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:09 IST

हायकोर्ट: जिल्हा विधी सेवा समित्यांनी समन्वय करावा

विशेष प्रतिनिधीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: सध्याच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात स्थलांतरित मजूर, शहरांमधील बेघर व समाजातील तळागळाचे वर्ग यापैकी कोणीही उपाशी राहणार नाही याची राज्य सरकारने व्यवस्था करावी आणि त्यांना अन्नाखेरीज पिण्याचे पाणी, औषधे, आरोग्यसेवा व स्वच्छतागृहांची सोय करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.सर्व हारा जन आंदोलन, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती व घर बचाओ घर बनाओ आंदोलन या संघटनांनी केलेल्या जनहित याचिकांवर न्या. अमजद सैयद यांनी व्हिडिओ सुनावणी घेऊन हा अंतरिम आदेश दिला. पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवून त्यावेळी अ‍ॅडव्होकेट जनरलनी यावे,असेही निर्देश न्यायालयाने दिले.न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांनी ज्या समाजवर्गांचे गाºहाणे याचिकांतून मांडले आहे त्यांची काळजी घेतली जात आहे, असे सरकार म्हणते. पण अनेक ठिकाणी या लोकांपर्यंत सरकारची मदत व लाभ पोहोचत नाहीत, अशी याचिकाकर्त्यांची तक्रार आहे. आपत्तीने विस्थापित झालेल्या लोकांच्या मदत आणि पुनर्वन कामात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांनी समन्वयाचे काम करून सरकारी मदत गरजूंपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्याची तरतूद कायद्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतही त्यांनी हे समन्वयाचे काम करावे.या लोकांसााठी सरकारकडून केल्या जात असलेल्या कामात कुठे त्रुटी वा उणिवा असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे असेल तर त्यांनी त्यासंबंधीचे निवेदन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेलने पाठवावे व त्याची प्रत ई-मेलनेच संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडेही पाठवावी. असे निवेदन मिळाल्यावर जिल्हा प्राधिकरणाने सक्षम अधिकाºयावर हे काम सोपवून संबंधित सरकारी अधिधकाऱ्यांकडे त्याविषयी पाठपुरावा करावा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांनी अशा प्रकारे केलेल्या कामाचा अहवालही न्यायालयास पाठवायचा आहे.या सुनावणीत याचिकाकर्त्यांसाठी ज्येष्ठ वकील गायत्री सिंग व अ‍ॅड.एल. सी. कक्रांती व रोनिटा भट्टाचार्य यांनी तर सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील बी. व्ही. सामंत यांनी काम पाहिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय