शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी गॅस प्रकल्पावर जप्तीची कारवाई करणार

By admin | Updated: March 24, 2015 00:11 IST

अखेरची घरघर : सरपंचांनी केली पोलीस कुमकची मागणी

गुहागर : रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड विद्युत प्रकल्पाकडून अंजनवेल ग्रामपंचायतीचे करापोटी ६१ लाख १० हजार ९५९ रुपये थकीत राहिले आहेत. कंपनी प्रशासनाकडून थकीत कर भरला जात नसल्याने अंजनवेल ग्रामपंचायतीने प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक पोलीस संरक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे.अंजनवेलचे सरपंच यशवंत बाईत यांनी याबाबत माहिती दिली. २०१४ - १५ या आर्थिक वर्षाकरिता रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाकडून करापोटी १ कोटी १९ लाख ८२ हजार २७४ रुपयांचे बिल बजावण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत कर अदा न केल्याने मागणी हुकूम बजावल्यानंतर ५८ लाख ७१ हजार ३१५ रुपये कर कंपनी प्रशासनाकडून ग्रामपंचायतीत भरणा करण्यात आला. उर्वरित करासाठी ६ जानेवारी २०१५ला नोटीस देण्यात आली होती. कंपनी प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. २७ फेब्रुवारी २०१५ला ग्रामपंचायतीकडून जप्तीपूर्व अंतिम नोटीस देण्यात आली. थकीत कराबरोबरच मागणी हुकूम शुल्क १ लाख १९ हजार ८२२ रुपये एवढी रक्कम येणे आहे. ही रक्कम कंपनी प्रशासनामार्फ त भरणा न केल्याने ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर विपरीत परिणाम झाला असल्याचा आरोप बाईत यांनी केला. थकबाकी वसुलीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायती कायदा १९५८ च्या कलम १२९ (८) अन्वये जप्ती प्रक्रियेचा अवलंब करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यासाठी १०० पोलिसांची मागणी बाईत यांनी केली आहे. ग्रामपंचायतीने आक्रमक पाऊल टाकल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)ग्रामपंचायतीच्या थकीत करापोटी रत्नागिरी गॅसवर जप्तीची कारवाई होणार.जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस कुमक उपलब्ध करून देण्याची मागणी. ६१ लाखांपेक्षा अधिक कर.