शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांवरील बलप्रयोगाचे पडसाद, पोलिसांवर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 04:13 IST

नाशिकमधील आदिवासी मुलांनी काढलेल्या मोर्चाला अडवल्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले.

नागपूर : नाशिकमधील आदिवासी मुलांनी काढलेल्या मोर्चाला अडवल्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. यासंदर्भात विद्यार्थ्यांवर बल प्रयोग करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. विरोधकांच्या मागणीनुसार संबंधित अधिकारी आणि आदिवासी आमदारांची बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण बंद करून त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येत आहे. याला विरोध करीत वसतिगृहात जेवण देण्याची पद्धत पूर्ववत करावी, या मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुणे ते नाशिक मोर्चा काढला. नांदूर शिंगोटे येथे पेलिसांनी या विद्यार्थ्यांवर बल प्रयोग केला. त्यांना पाोलीस व्हॅनमध्ये डांबल्याचे सांगत पोलिसांवर कारवाई करावी. तसेच डीबीटी पद्धत ताबडतोब रद्द करून वसतिगृहातील जेवण सुरू करावे अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हा मुद्दा लावून धरला. ते विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पायी जात होते. त्यांच्यावर अशी दडपशाही का करण्यात आली.प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबतही दडपशाही करण्यात आल्याचे सांगत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय वसतिगृहातील जेवण निकृष्ट असते. त्यामुळे ते बंद करण्याची मागणी करणारी अनेक निवेदने विद्यार्थ्यांकडून शासनाला मिळाली होती. त्यानुसार डीबीटी योजना अणण्यात आली. ती सर्वत्र लागू नाही. केवळ शहरातील आदिवासी वसगिृहातील जेवण बंद करून त्यातील पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात. त्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मुलेही राहतात. ते शिकणाºया मुलांवर दडपशाही करतात. ती मुलेही मोर्चात मोठ्या प्रमाणावर सामील होती. त्यामुळे आंदोलनात विद्यार्थी अनुचित प्रकार घडवू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्या मुलांना अडवले आणि त्यांना व्हॅनमध्ये बसवून त्यांच्या गावी सोडले होते. बल प्रयोग झाला नाही. त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही आहे. असे असले तरी या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीसंदर्भात संबंधित अधिकारी आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन तोडगा कााढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Policeपोलिस