शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइनची साथ पसरणार वेगात! वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:33 IST

मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई: दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर राज्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण असून  बाजारात त्याचप्रमाणे  गणेशोत्सव मंडळांत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाची दाहकता कमी झाली असली तरी काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. गेल्या आठ महिन्यांत राज्यात २,३३७ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे, तसेच ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीत गर्दीमुळे  स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी या काळात सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरानागरिकांनी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा. मात्र, त्याचवेळी स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाचेही भान ठेवावे. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी शक्यतो मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूसारख्या आजाराचा प्रादुर्भाव शक्यतो वाढणार नाही. परंतु आपण कोणतेच भान बाळगले नाही, तर त्याचा भविष्यात नक्कीच त्रास होऊ शकतो. - डॉ. राहुल पंडित, सदस्य, राज्य कोरोना कृती दल. 

 कोरोना नियमांचे पालन गरजेचेकोरोनाचा कराल काळ आपण पाहिला, अनुभवला. त्यातून आपण काही शिकलो की नाही, हा प्रश्न आहे. मूलभूत गोष्टी आपण विसरतो. इकडे तिकडे थुंकणे, शिंकताना नाकावर रुमाल न ठेवणे या सगळ्या गोष्टी थांबायला हव्या. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालून जायला हवे, हे आता लोकांनी कधीच विसरता काम नये. विशेषत: सहव्याधी असलेल्यांनी तर हे नियम काटेकोरपणे पाळायलाच हवे. संसर्गजन्य आजारांपासून दूर राहायचे असेल तर कोरोनाच्या अनुषंगाने जे नियम पाळत होतो, ते पाळणे गरजेचे आहे.  - डॉ. समीर गर्दे, श्वसनविकार तज्ज्ञ 

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्यMumbaiमुंबई