शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानचे 'एनडीए'तील स्थान आणि राणेंचे मंत्रिपद अजून हवेत- प्रमोद जठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:36 IST

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 'एनडीए'तील स्थान आणि नारायण राणेंचे मंत्रिपद या दोन्ही गोष्टी अजून हवेतच आहेत.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 'एनडीए'तील स्थान आणि नारायण राणेंचे मंत्रिपद या दोन्ही गोष्टी अजून हवेतच आहेत. त्या जमिनीवर आल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी दिलेल्या मैत्रीच्या ऑफरवर चर्चा करु, अशी गुगली भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी वैभववाडीत टाकली.भाजपचा एक सदस्य असताना नारायण राणे यांनी त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद दिले होते. आता भाजपचे सहा सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी मैत्री केली तर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेची पदे मिळू शकतील, अशी खुली ऑफर आमदार नीतेश राणे यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेत शनिवारी दिली आहे. नीतेश राणेंची ऑफर भाजपा स्वीकारणार का? असे पत्रकारांनी प्रमोद जठार यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, स्वाभिमान पक्षाचे 'एनडीए'तील स्थान आणि नारायण राणेंचे  मंत्रीपद ही हवेतील चर्चा आहे. ती जमिनीवर येवू दे. त्यानंतरच त्यांच्या ऑफरवर चर्चा करु. आताच त्याबाबत चर्चा करणे उचित ठरणार नाही, असे जठार यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मला सत्तेत एकत्र असल्याची जाणीव करून देत आहेत. परंतु, जिल्ह्यातील विकासाचे व्यवस्थापन करण्यात पालकमंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत. सरकारच्या माध्यमातून येणा-या निधीचा योग्य विनियोग करुन जनतेचे जीवन सुसह्य बनविणे ही घटक पक्ष म्हणून भाजपबरोबरच शिवसेनेचीही जबाबदारी आहे. परंतु, यश आले तर त्याचे श्रेय शिवसेनेने घ्यायचे आणि अपयश आले तर ते भाजपच्या माथी मारायचे. ही दुटप्पी भूमिका शिवसेनेने सोडून द्यावी, असा सल्ला प्रमोद जठार यांनी दिला.'तुमच्यावर भरोसा नाय का?'प्रमोद जठार मित्रपक्षातील आहेतच. त्याचबरोबर ते आपलेही मित्र आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्यावर टीका करु नये, असे विधान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यावर जठार म्हणाले की, सत्तेत असूनही खड्ड्यांच्या मुद्यावर शिवसेना  रस्त्यावर आंदोलन करते. त्यामुळे मला दिलेला सल्ला केसरकरांनी उध्दव ठाकरे आणि अरुण दुधवडकर यांना द्यावा. त्यांचा तुमच्यावर भरोसा नाय का? असा मिश्किल प्रश्न यावेळी केसरकरांना उद्देशून जठार यांनी केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Pramod Jatharप्रमोद जठार