शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातही दुधप्रश्नी स्वाभिमानीचे आंदोलन; मध्यरात्रीपासून प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 16:24 IST

दूध अनुदानप्रश्नी विदर्भातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

बुलडाणा : दूध अनुदानप्रश्नी विदर्भातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. दरम्यान, गनिमीकाव्याने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी ‘लोकमत’शीबोलताना दिले.दुसरीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी गेल्यावर्षी पुकारलेल्या संपादरम्यान काही मंत्र्यांना हाताशी धरून शासनाने शेतकर्यांच्या आंदोलनात फुट पाटण्याचा प्रयत्न केला होता तीच पद्धत दुध आंदोलनप्रश्नी वापरण्यात येत असल्याचे  तुपकर यांचे म्हणणे आहे.प्रती लिटर पाच रुपयाप्रमाणे दुधाचे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभीमानीने १६ जुलै पासून मुंबईचे दूध तोडण्याचा इशारा दिला आहे. मध्यरात्रीपासून हे आंदोलन करण्यात येणार आहे.पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश सोबतच विदर्भातही या आंदोलनाची धार वाढविण्यात येणार असल्याचे तुपकर म्हणाले. दरम्यान, त्यानुषंगाने स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांच्या बैठकाही झाल्या असून हे आंदोलन गनिमी काव्याने करण्यात येणार आहे. बुलडाण्याचे कुलदैवत जगंदबा देवीला दुग्धाभिषेक करून या आंदोलनास प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे.दुसरीकडे दुधप्रश्नी स्वाभिमानी आक्रमक झाल्यानंतर काही संघांनी तथा शासनाने तीन रुपये वाढ करण्याची भाषा वापरून आंदोलनात फुट पाडण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप तुपकरांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रश्नी आक्रमक झाल्यानंतर दूध संघ आणि शासनाला तीन रुपये वाढ करण्याचे कसे सुचले असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी जोपर्यंत मागणी पूर्ण होणारनाही, तोपर्यंत मागे हटण्याचा प्रश्न नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, स्वाभिमानीचे पदाधिकारी राणा चंदन यांनी बुलडाणा जिल्ह्यातही आंदोलन होणार असल्याचे संकेत दिले. मात्र आंदोलनाचे नेमके स्वरुप काय असेल याबाबत त्यांनी माहिती मात्र दिली नाही.

सरकारला आंदोलनाला हिंसक वळण लावायचे?पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तो यशस्वी होणार नाही. आंदोलनात कर्जमुक्तीच्या आंदोलनाप्रमाणे काही मंत्र्यांना हाताशी धरून फुट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ही तुपकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :milkदूधbuldhanaबुलडाणा