शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांच्या जप्तीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 03:01 IST

सहकारमंत्र्यांनी निर्णय मागे न घेतल्यास त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम न देणाऱ्या २ साखर कारखान्यांविरोधात काढलेल्या जप्तीच्या नोटिसीला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली असून, तिघा कारखान्यांची सुनावणी सुरू आहे. राज्यातील तेरा कारखान्यांकडे तब्बल ३९३ कोटी ६३ लाख रुपयांच्या रकमेची थकबाकी आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी हा निर्णय मागे न घेतल्यास त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.उसाची एफआरपी आणि दूध प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २९ जून रोजी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. त्या वेळी साखर आयुक्तांनी उसाची थकीत रक्कम वसूल करण्यास २१ जुलै पर्यंत अवधी मागितला होता. तसेच, रक्कम वसूल न झाल्यास रक्कम न देणाºया कारखान्यांचे जप्ती आदेश घेऊनच आम्ही जाऊ, असे शेट्टी यांनी सांगितले होते. कारखान्यांकडे २९ जून रोजी १९०० कोटी रुपये थकीत होते. त्यानंतर १५ जुलैपर्यंत थकीत रक्कम ८४८ कोटी आणि त्यानंतर २१ जुलै रोजी ७६१ कोटी रुपये रक्कम थकीत होती.जप्तीच्या आदेशाला दिलेली स्थगिती तीन दिवसांत न उठविल्यास स्वाभिमानी शेतकरी सहकारमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पृथ्वीराज जाचक, अ‍ॅड. योगेश पांडे, राजेंद्र ढवाण पाटील, रौनक शेट्टी यांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांची भेट घेतली. साखर आयुक्तांनी ३९३ कोटी रुपयांपैकी २०० कोटींची रक्कम सात दिवसांत वसूल होणे अपेक्षित असल्याचे आश्वासन या वेळी दिले.थकबाकी न देणाºया १३ कारखान्यांच्या जप्तीचे आदेश दिले होते. ६४० कोटी रुपयांची रक्कम थकीत होती. नोटिशीनंतर २४६ कोटी रुपयांची वसुली झाली. ३९३ कोटी ६३ लाख रुपयांची या कारखान्यांकडे थकबाकी आहे. जप्तीचे आदेश असलेल्या कारखान्यांकडे ७६१ कोटी रुपये थकीत आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी