शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राज्य सरकारचा यू टर्न; वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 06:19 IST

विरोधकांच्या हल्ल्यानंतर अजित पवारांची घोषणा 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सभागृहात चर्चा होऊन  काही ठरत नाही तोपर्यंत राज्यातील कृषी, घरगुती वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत सरकारला घेरले आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चेची मागणी लावून धरली. त्यावर पवार यांनी स्थगितीची घोषणा केली. भाजपच्या विधिमंडळ सदस्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आ. राम सातपुते यांच्या नेतृत्वात विधान भवनच्या पायऱ्यांवर कामकाज सुरू होण्यापूर्वी वीज कनेक्शनप्रश्नी जोरदार घोषणा देत फलक फडकविले. अवास्तव वीज बिले रद्द करा, अशी मागणीही त्यांनी केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच फडणवीस यांनी हल्लाबोल केला.  काँग्रेसचे आ. नाना पटोले यांनीही वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती देण्याची मागणी उचलून धरली. त्यावर सभागृहात सदर विषयावर चर्चा होऊन काही ठरत नाही तोपर्यंत कनेक्शन कापण्यास स्थगिती देत असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. कृषिपंपांना दिवसा वीज - मुख्यमंत्रीकृषिपंपांना दिवसा वीज देण्याला आपल्या सरकारचे प्राधान्य असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ऊर्जा विभागाच्या महा कृषी ऊर्जा अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ३० हजार कृषीपंपांना दिवसा वीज दिली जात असल्याचे सांगितले.

अशी आहे थकबाकी

उच्चदाब ग्राहक    ९४६ कोटी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक लघुदाब ग्राहक    ५,०८९ कोटी कृषी पंप    ७९५ कोटी सार्वजनिक पाणीपुरवठा     ७३ कोटी पथदिवे     ७९५ कोटी

७१५४कोटी एकूण थकबाकी वीज ग्राहकांकडे असल्याचा दावा महावितरणने केला आहे. 

१०,००० कनेक्शन सरासरी प्रत्येक जिल्ह्यात कापण्यात आले आहेत.

टॅग्स :electricityवीजAjit Pawarअजित पवार