शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

तीन कार्यकारी अभियंते निलंबित

By admin | Updated: May 9, 2015 01:38 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी दोघे गैरव्यवहारात अडकलेले असून, एक

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी दोघे गैरव्यवहारात अडकलेले असून, एक जण बदलीच्या जागी रुजू झाले नाहीत म्हणून निलंबित झाले. आनंद कुलकर्णी यांनी बांधकाम विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासूनचे हे पंचविसावे निलंबन आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्यांमध्ये बीड येथील व्ही.के. बाविस्कर, औरंगाबादच्या दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे गिरीश जोशी आणि नाशिकच्या ओल्या पार्टीप्रकरणी गाजलेले आर.टी. पाटील यांचा समावेश आहे. गिरीश जोशी हे नांदेड जिल्ह्यात कार्यकारी अभियंता असताना रस्त्यांच्या कामात लाखोंचे गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, या प्रकरणी त्यांची चौकशीही सुरू आहे. त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. रस्त्यांची कामे तुकडे न करताच करावीत असा नियम असताना व्ही.के. बाविस्कर यांनी ती तुकड्यांमध्ये केली. हॉटमिक्सची कामे मजूर सहकारी संस्थांना देऊ नयेत, असा नियम असतानाही ती त्यांच्या कार्यकाळात दिली गेली. शिवाय, कंत्राटदारांनी कामे अपूर्णावस्थेत सोडून दिल्याने ती बांधकाम विभागाला आपल्या खर्चाने पूर्ण करावी लागली. त्यामुळे विभागाला आर्थिक फटका सहन करावा लागला, असाही आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींच्याही तक्रारी होत्या. (विशेष प्रतिनिधी)