शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ 22 मृतदेहांच्या विटंबनेप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 23:40 IST

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला.ते म्हणाले की, मुंबई पोलिसांनी केलेला हा प्रकार मानवतेची क्रूर थट्टा आणि असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. जिवंत अन् मेलेल्या माणसांनाही जनावरासारखी वागणूक देणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा आणि प्रशासनाचा करावा तेवढा निषेध कमीच ठरेल. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी म्हणून मुंबई पोलीस आयुक्त व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

.....आणि मुंबई पोलिसांनी माणुसकीचाही बळी घेतला!एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले. मात्र या घटनेत माणुसकीचाही बळी गेला. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातल्या उरल्या सुरल्या माणुसकीला मूठमाती देऊन त्यावर स्वत:च्या पराक्रमाचा झेंडाच लावलाय. जे २२ लोक मेले त्यांच्या कपाळावर १ ते २२ असे नंबर लिहिण्याचे शौर्यकाम मुंबई पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे मृतांचे कपाळावर नंबर लिहिलेले हे फोटो पोलिसांनी रिलीज केले आहेत. जनाचीही नाही आणि मनाचीही नाही, आम्हाला लाजच उरली नाही...! या मृतांमध्ये जर तुमचे कोणी नातेवाईक असते, कोणाची आई असती, कोणाची बहीण असती तर तुम्ही त्यांच्या कपाळावर नंबर लिहिण्याची हिंमत केली असती का ? २२ मृतदेह होते. त्यांच्या नातेवाईकांनी चेह-यावरूनही ते ओळखले असते. त्यासाठी त्यांच्या कपाळावर नंबर लिहून त्या मृतदेहांची विटंबना करण्याची हिंमत पोलिसांची झालीच कशी? ज्यांनी कोणी हे केले त्याची वर्दी तातडीने काढून घेतली पाहिजे. नियतीनेच ज्यांच्या कपाळी असा दुर्दैवी मृत्यू लिहिला त्यांच्या कपाळावर ते मेल्यावर असा नंबर लिहून विटंबना करण्याची कल्पना तरी पोलिसांच्या मनात कशी येऊ शकते. 

परळ चेंगराचेंगरी दुर्घटनेला काँग्रेसच जबाबदार, भाजपाच्या किरीट सोमय्यांनी फोडलं खापरभाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी पररळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. गेल्या 15 वर्षांपासून मागणी होत असतानाही काँग्रेस सरकारने या पुलाचा प्रश्न सोडवला नाही, म्हणून ही दुर्घटना घडल्याच्या उलट्या बोंबा सोमय्या यांनी लगावल्या आहेत. दुर्घटना स्थळाला भेट दिल्यावर त्यांनी दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला. मात्र घटनेचे खापर त्यांनी काँग्रेसवरच फोडले. तीन वर्षापासून भाजपा मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या समस्यांवर काम करत आहे. मात्र यापुढील काम युद्ध पातळीवर करण्याची गरजही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरी