शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Sushma Andhare : बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने 'चिडका बिब्बा' नाव पडेल; अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 14:30 IST

Sushma Andhare Slams BJP Devendra Fadnavis : सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडीओ ट्वीट केले आहेत. तसेच फडणवीसांनाही खोचक टोला लगावला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. सुषमा अंधारेंच्या भाषणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अंधारे यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (BJP Devendra Fadnavis) विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आमच्या श्रीकृष्णाबद्दल तुमच्या नेत्या बोलतात, पण तुम्ही त्याबद्दल काहीही बोलत नाही. तुम्ही मूग गिळून बसलेले आहात, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल केला. यानंतर आता सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडीओ ट्वीट केले आहेत. तसेच फडणवीसांनाही खोचक टोला लगावला आहे. "देवेंद्रभाऊ वादाला तोंड फुटलेच आहे तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा.  हे भाजपाचे लोक आहेत की परग्रहावरचे? आणि यावर आपलं नेमकं मत काय आहे? बाकी तुम्ही माझ्यावर हल्ला करण्याइतके अस्वस्थ झालेलं बघून आनंद वाटला" असं म्हणत टीकास्त्र सोडल आहे. 

"बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ?"

"बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने 'चिडका बिब्बा' नाव पडेल" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे य़ांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाऊ शेवटचे दोनच प्रश्न. माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून तेरा वर्ष मागे जाऊन उत्खनन का केलं आणि करायचं उत्खनन तर तेरा वर्ष का वाट बघितली की तेव्हा मी शिवसेनेत नव्हते म्हणून भीती वाटली नाही. शेवटचा प्रश्न बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने #चिडका_बिब्बा नाव पडेल बरं" असं म्हटलं आहे. 

"भाजपाच्याच 15 लोकांना clean chit कशी मिळाली?"

"भाऊ महाप्रबोधन यात्रेतून तुम्हाला महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, असंघटित कामगार संबंधाने प्रश्न विचारते, भाजपाच्याच 15 लोकांना clean chit कशी मिळाली? Bjpचे सगळेच स्वच्छ कसे ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या चौकशी का थांबल्या? कित्ती साधे प्रश्न विचारले?" असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 

सुषमा अंधारेंनी फडणवीसांच्या आरोपांना सोलापुरातून प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस इतके अभ्यासू आहात, नाही नाही ते सर्व मुद्दे काढले होते. 13 वर्षे तुम्ही झोपला होतात का? आत्ता तुम्हाला हे सर्व सुचतंय का? तुम्हाला असं वाटतंय की, तुमच्या या जाळ्यात मी अडकेल, पण अजिबात नाही. यानंतरही मी चुकतेय असं वाटत असेल, तर मी पुन्हा एकदा सांगते की, भागवत संप्रदायाचा कुठलाही सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही. हे मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत, असे म्हणत सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर पलटवार केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण