शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

"शिवसेना ९५ जागा जिंकेल हा सर्व्हे प्रशांत किशोरांनी उद्धव ठाकरेंना दिला होता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 13:39 IST

महाविकास आघाडीतील मतभेद टोकाला आलेले आहेत. आता हे एकमेकांशी फारकत घेण्याच्या मनस्थितीत आले आहेत असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

मुंबई - कुठल्याही एजन्सीने दिलेला सर्व्हे हा परिपूर्ण नसतो. सर्व्हे हा निवडणुकीपूर्वी झालेला असतो. निवडणुकीसाठी महिना-सव्वा महिना राहिलेला असताना केलेले सर्व्हे एखाद्यावेळेस पुढे-मागे होतात. मागच्या वेळी प्रशांत किशोर याला उद्धव ठाकरेंनी काम दिले होते. शिवसेनेला ९५ जागा मिळतील असा सर्व्हे त्याने दिला होता. आम्ही त्याच अर्विभावात होतो आम्हाला ९५ जागा मिळणार आहेत. जिथून मी निवडणूक लढतो ती जागा पडणार आहे असा सर्व्हे दिला होता. उद्धव ठाकरेंनी मला सांगितले. पण याच ठिकाणी मी सर्वाधिक मतांनी निवडून आलो असं विधान शिंदे गटात गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, सर्व्हेवर अंदाज बांधायचे असं नसतं. शरद पवारांच्या एका पावसाच्या सभेने सगळे सर्व्हे गुंडाळून टाकले होते. पश्चिम महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार झाले. सर्व्हे अंदाज हा त्यांच्या मनाच्या समाधानासाठी चांगला आहे. संजय राऊतला अत्यंत आनंद झाला असेल. कारण हा माणूस माणसांत राहत नाही. भांडूप व्हाया मातोश्री प्रभादेवी इथे बसणारा माणूस या सर्व्हेवर बोलायला लागलाय. ज्याला काही माहिती नाही जो कशावरही बोलतो. प्रकाश आंबेडकरांनी राऊतांना त्यांची जागा दाखवली. काल जे खुर्ची लावून शेजारी बसले होते. त्यांनी म्हटलं कोण संजय राऊत मी ओळखत नाही. लायकी ओळखा. पातळी पाहून विधान करा असंही त्यांनी म्हटलं. 

महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नाहीचारही पक्षात मतभिन्नता आढळून येतेय मग सर्व्हेचे काय होईल. वंचित-ठाकरे गट युती झाली ती किती काळ चालेल याची कल्पना नाही हे स्टेटमेंट मी पहिल्याच दिवशी केले होते. २ दिवस झाले. अजून निवडणुका यायच्यात. लोकसभा निवडणुका दूर आहेत. जेव्हा महापालिका निवडणुका येतील तेव्हा यांच्यातील मतभेद उफाळून येणार आहेत. महाविकास आघाडीतील मतभेद टोकाला आलेले आहेत. आता हे एकमेकांशी फारकत घेण्याच्या मनस्थितीत आले आहेत. लवकरच या आघाडीची बिघाडी होणार आहे. ही महाविकास आघाडी अस्तित्वातच राहणार नाही असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrashant Kishoreप्रशांत किशोरSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv Senaशिवसेना