शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाच्या धक्क्याने सरकारला आली जाग; घनकचऱ्याच्या ३२ पालिका आराखड्यांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 00:28 IST

राज्यातील ३२ महापालिका व नगरपालिकांच्या १७८ कोटी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्यास शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.

मुंबई : राज्यातील ३२ महापालिका व नगरपालिकांच्या १७८ कोटी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्यास शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन नसेल तर बांधकामांवर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार कामाला लागल्याचे दिसते.पुणे ९, कोकण ५, नागपूर ६, नाशिक २, औरंगाबाद ३ आणि अमरावती विभागातील ७ स्थानिक स्वराज्य संस्थांचा आराखड्यांचा त्यात समावेश आहे. राज्यातील २१३ स्थानिक स्वराज्य संस्थांचा घनकचरा व्यवस्थापन आराखडा यापूर्वीच मंजूर झाला असून मंगळवारी ३२ संस्थांनी त्याचे सादरीकरण केले. अद्याप १५ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आराखडा सादर होणे बाकी आहे. मंजूर झालेल्या २१३ आराखड्यांपैकी १४० प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली.बैठकीत पुणे विभागातील पलूस, तळेगाव, दौंड, जयसिंगपूर , चाकण, म्हसवद, राजगुरुनगर, बार्शी, हुपरी, कोकण विभागातील पनवेल, अंबरनाथ, माथेरान, सावंतवाडी, जव्हार, नागपूर विभागातील मौदा, नागभिड, वाडी, गडचांदूर, गोंदिया, कामठी, नाशिक विभागातील त्र्यंबकेश्वर, श्रीरामपूर, औरंगाबाद विभागातील तुळजापूर, मुखेड, वसमतनगर, अमरावती विभागातील अमरावती, शेंदूरजनाघाट , मंगळूरपीर, पुसद, खामगाव, लोणार आणि बाळापूर अशा ३२ स्थानिक स्वराज्य संस्थांचा आराखडा मंजूर झाला. सहा विभागांसाठी पाच सल्लागार संस्थांची नेमणूक केली आहे. बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र