शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाने महावितरणला दिले अदानी पॉवरचे १० हजार कोटी देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:05 IST

सर्वोच्च न्यायालयाने महावितरणला अदानी पॉवरचे १० हजार कोटी देण्याचा आदेश दिला असून यासाठी २८ फेब्रुवारीची मुदत दिल्याने कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत.

- आशिष रॉयनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने महावितरणलाअदानी पॉवरचे १० हजार कोटी देण्याचा आदेश दिला असून यासाठी २८ फेब्रुवारीची मुदत दिल्याने कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत.महावितरणनेअदानीच्या तिरोडा प्रकल्पातून ३ हजार ३०० मेगावॅट वीज खरेदी केली होती. त्याचे २० हजार कोटी रुपये महावितरणकडे थकीत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणने बँकेकडून आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळविली आहे. कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले असून दैनंदिन कार्याकरिता पैशांची गरज आहे, असे कारण महावितरणने दिले होते. महावितरणचे ग्राहकांकडे ७२ हजार कोटी रुपये थकीत आहेत. वीज कपात व चोरी थांबविण्याच्या मोहिमेचा विशेष फायदा झाला नाही. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत अदानी कंपनीला १० हजार कोटी देणे अशक्य आहे. बँकाही कर्ज देण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. महावितरण महानिर्मितीलाही ९ हजार कोटी रुपये देणे आहे. ही रक्कम थकल्यामुळे महानिर्मितीने कोळसा खाण कंपन्यांचे २ हजार ६०० कोटी रुपये दिले नाही. याकरिता महानिर्मितीने बँकांकडून दोन हजार कोटी रुपयाचे कर्ज घेतले आहे. 

मालमत्ता विक्रीतून हजारो कोटी उभे करणे शक्यमंत्रालयाने महावितरणची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्राइस वाटर हाऊस कुपर्सचे मार्गदर्शन मागितले आहे. महावितरणने पुणे, ठाणे, नागपूर इत्यादी मोठ्या शहरांतील मालमत्ता विकल्यास हजारो कोटी रुपये उभे होतील, तसेच कंपनीला इतर ग्राहकांना चांगल्या पद्धतीने सेवा पुरविता येईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. अदानी, टोरेंट व टाटा कंपनीने आधीच नागपूर, पुणे इत्यादी शहरातील वीज पुरवठ्याचे गुप्तपणे सर्वेक्षण केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAdaniअदानी