शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबाः देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 15:46 IST

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबईः कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, भारतालाही त्याला मोठा फटका बसला आहे. देशातल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. ठाकरे सरकारही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. राज्यात जवळपास ९० हजारांपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला, शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखादं दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कोकणात मोठं नुकसान झालंय, सरकारची मदत तोकडी आहे, महापुरावेळी निकष बाजूला ठेवून मदत केली, यावेळीही सरकारने तसंच करावं, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार यंदा अधिवेशनाचा कालावधी कमी करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ३ ऑगस्टपासून सुरु होईल, तसेच हे अधिवेशन फक्त ४ दिवस चालेल असं सांगण्यात येत आहे. मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच सरकारी अधिकारी, कर्मचारी, आमदार यांना एकत्र आणून हे अधिवेशन कसं करायचं यावर बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात विधानसभेचे २८८ आणि विधान परिषदेचे ७८ आमदार आहेत, अधिवेशनासाठी विधान भवन तसेच मंत्रालयातील कर्मचारी अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित असतात, मात्र यंदाचं अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा वेगळं असणार आहे, कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने अधिवेशनाचं स्वरुप, कालावधी या सर्व गोष्टी बदलणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस