शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

उपराजधानीत नव्या सॉफ्टवेअरचा शोध

By admin | Updated: May 25, 2014 00:52 IST

शहरातील एका २४ वर्षाच्या तरुणाने सॉफ्टवेअरमध्ये कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्याने एक असे सॉफ्टवेअर तयार केले आहे की ज्यामुळे काही मिनिटात संगणक, लॅपटॉप आणि स्मार्ट फोनच्या

तरुणाची कामगिरी : मिनिटात वाढणार संगणक, लॅपटॉप, स्मार्ट फोनची गती

वसीम कुरेशी - नागपूर

शहरातील एका २४ वर्षाच्या तरुणाने सॉफ्टवेअरमध्ये कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्याने एक असे सॉफ्टवेअर तयार केले आहे की ज्यामुळे काही मिनिटात संगणक, लॅपटॉप आणि स्मार्ट फोनच्या फंक्शनला स्कॅन करून त्याची काम करण्याची गती ७0 टक्के वाढते. विशेष म्हणजे या तरुणाने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा कुठलाही कोर्स न करताच हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. जगात अशा प्रकारचे कुठलेच सॉफ्टवेअर तयार झाले नसल्याचा दावाही त्याने केला आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली ही कामगिरी आहे धम्मदीपनगर येथील रहिवासी विशाल रवींद्र वरुडकरची. फक्त बारावीपर्यंंत त्याने शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याने २00८ मध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर अप्लिकेशनचा (डीसीए) कोर्स केला. यात केवळ संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तो पुढील शिक्षण घेऊ शकला नाही. विशालला हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी तीन वर्षांंचा कालावधी लागला. त्यानंतर त्याने व त्याच्या सहकार्‍यांनी दोन वर्ष याचे निरीक्षण केले. त्याच्या मतानुसार हे काम त्याने देशासाठी केले आहे. यामुळे देशाचे नाव कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात उंचावणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. सॉफ्टवेअरमध्ये अनेक विशेष बाबी असल्यामुळे त्यास पेटेंट सर्टिफिकेट मिळाले आहे.

काय आहे सॉफ्टवेअरची विशेषता

सॉफ्टवेअरचे नाव ‘जी.के. कॉम्प्युटर स्कॅनर द कॉम्प्युटर स्पीड क्रिएटर’ आहे. ते इन्स्टॉल केल्यानंतर कॉम्प्युटरच्या फंक्शनला स्कॅन करण्यात येते. त्यानंतर कॉम्प्युटरवर १00 पेक्षा अधिक अप्लिकेशन सुरू केल्यानंतरही तो हँग होत नाही. एवढेच नव्हे तर यामुळे काही सेकंदात कॉम्प्युटर सुरू आणि बंद होतात. हे सर्व बुटींग स्पिड वाढल्यामुळे होते. मोठमोठे सॉफ्टवेअर चालविल्यामुळे संगणकाची गती मंदावते. परंतु या सॉफ्टवेअरमुळे संगणकाची गती मंदावत नाही. हे विंडोजच्या सर्व ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्य करते. या शोधामुळे एकाच सिस्टिमवर जलद गतीने मल्टीटास्किंग शक्य होणार आहे.

मंद गतीने केले लक्ष आकर्षित

बॅंक, इंटरनेट कॅफे, शाळा, महाविद्यालय आणि मित्रांच्या घरी संगणकाची मंद गती विशालच्या लक्षात आली. त्याने सांगितले की, हे पाहून संगणक, लॅपटॉप, स्मार्ट फोनची गती वाढविणारे सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय घेतला.

दोन वर्ष केले निरीक्षण

सॉफ्टवेअरचे दोन वर्षे निरीक्षण करण्यात आले. नवे, जुने संगणक, अप्लिकेशन, नवे सॉफ्टवेअरमध्ये तपासणी केली. याशिवाय स्मार्ट फोनमध्येही प्रयत्न केल्यानंतर त्याला यश मिळाले. परीक्षण करणार्‍या चमूत सॉफ्टवेअर इंजिनिअरींगचे विद्यार्थी अभिलाष पसारे, आशा पाटील, रवींद्र फुलझेले, अतुल चरपे, स्वप्नील गजभिये यांचा समावेश आहे.

वडील विकतात फळे

विशालने सांगितले की त्याचे वडील रस्त्यावर हातठेला लावून फळे विकतात. आई गृहिणी आहे. आई विमल वरुडकर यांनी सांगितले की २00९ मध्ये कर्ज घेऊन १0 हजार रुपयात एक जुने संगणक विकत घेऊन दिले. आपला मुलगा संगणक क्षेत्रात काहीतरी नवे करू शकेल याची खात्री होती. विशालनेही आईचा विश्‍वास खरा ठरवून २0१0 मध्ये कामाला सुरुवात केली.

गरिबी पाहिली आता रोजगार देणार

विशालने सांगितले की कठीण परिस्थितीत हे काम केले आहे. आईनेही यात सहकार्य केले. आता आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना संधी देण्याची इच्छा आहे. मिहानच्या माध्यमातून नागपूर देशाच्या आयटी क्षेत्रात पुढे येत आहे.

शहरात अनेक प्रतिभावंत असून ते या क्षेत्रात नागपूरचा नावलौकिक वाढवू शकतात. सुपर कॉम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांनी विशालच्या शोधाची स्तुती करून त्याला मार्गदर्शन केले. त्यांच्या मते विशालने सॉफ्टवेअरमध्ये अपग्रेडेशन केले आहे.

कशी मिळाली प्रेरणा

बिल गेट्सची टीव्हीवर मुलाखत पाहून विशालला आपण संगणक क्षेत्रात काहीतरी नवे करू शकतो असा विचार आला. तेव्हाच त्याने मनाशी असे सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय घेतला की ते सर्वात आधुनिक असेल.