शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या सुनील पाटीलने माझ्यावर पिस्तूल रोखले-  रोहिणी खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 05:24 IST

Rohini Khadse : जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत येत असताना रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या कारसमोर तीन मोटारसायकल आडव्या झाल्या आणि रस्ता अडविला.

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर सोमवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चार अशा सातजणांविरुद्ध मंगळवारी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये  शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई आणि चांगदेव ग्रा. पं. सदस्य पंकज कोळी यांचा समावेश आहे.

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत येत असताना रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या कारसमोर तीन मोटारसायकल आडव्या झाल्या आणि रस्ता अडविला. यावेळी गाडीच्या प्रकाशात चेहरे दिसून आले, त्यात  सुनील पाटील याने वाहनांच्या डाव्या बाजूने येऊन माझ्याकडे पिस्तूल रोखले.

चांगदेव ग्रा. पं. सदस्य पंकज कोळी याच्या हातात तलवार होती तर, छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून लॉक असल्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी गाडीवर हल्ला चढविला. यात गाडीची काच फुटली.

अंधारात त्यांच्यासोबतचे अन्य चार अनोळखी  आरोपीही या हल्ल्यात सामील होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Rohini Khadseरोहिणी खडसेeknath khadseएकनाथ खडसे