शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

समन्स स्पीड पोस्ट, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवणार! गृहविभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:13 IST

न्यायालयात दाखल विविध खटल्यांत वेळोवेळी लागू करण्यात येणाऱ्या समन्स, नोटिसा संबंधितांना वेळेत पोहोचण्यासाठी आता हायटेक व इलेक्ट्रॉनिक पद्धतींचा वापर केला जाणार आहे. स्पीड पोस्टबरोबरच ई-मेल व एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे समन्स पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे खटल्यातील पंच, साक्षीदारांना सुनावणीसाठी मुदतीत न्यायालयात हजर राहता येणे शक्य होणार आहे.

- जमीर काझीमुंबई  - न्यायालयात दाखल विविध खटल्यांत वेळोवेळी लागू करण्यात येणाऱ्या समन्स, नोटिसा संबंधितांना वेळेत पोहोचण्यासाठी आता हायटेक व इलेक्ट्रॉनिक पद्धतींचा वापर केला जाणार आहे. स्पीड पोस्टबरोबरच ई-मेल व एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे समन्स पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे खटल्यातील पंच, साक्षीदारांना सुनावणीसाठी मुदतीत न्यायालयात हजर राहता येणे शक्य होणार आहे. पोलीस महासंचालकांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रस्ताव गृहविभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. उच्च न्यायालयाने त्यासंबंधी दिलेल्या निर्देशानुसार, झटपट कार्यवाहीसाठी ही उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.विविध न्यायालयांत दाखल असलेल्या खटल्यांमध्ये सुनावणीच्या वेळी आरोपी, फिर्यादीबरोबरच पंच, साक्षीदारांना हजर राहावे लागते. त्याबाबत लागू केलेले समन्स, नोटिसा या संबंधित पोलीस ठाण्यामार्फत पाठविण्याची तरतूद आहे. मात्र, बहुतांश वेळा त्यांना वेळेवर समन्स, नोटीस न मिळाल्याने संबंधित न्यायालयात गैरहजर राहतात आणि खटल्याचे कामकाजही रेंगाळते. त्यामुळे हजारो खटल्यांना गती येण्यासाठी ही सूचना न्यायालयाने दिली आहे. त्यानुसार, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९९३च्या प्रकरण ६ मध्ये कलम ६१ ते ६९ अन्वये आणि कलम ७० ते ८१ अन्वये समन्स बजावण्याबाबत कार्यपद्धतीप्रमाणे लागू करण्यात येत आहे. तत्काळ व कालबद्ध मुदतीत ते लागू करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, या कामावर समन्वयासाठी पोलीस आयुक्तालयात गुन्हा अन्वेषण शाखेत, तर अधीक्षक कार्यालयात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाºयांची नेमणूक केली आहे. दर महिन्याला घटक प्रमुखाकडून आढावा घेतला जातो. मात्र, पोलिसांकडील कामाचे ओझे आणि अपुºया मनुष्यबळामुळे वेळेत समन्स, वॉरंट्स मिळत नसल्याची तक्रार कायम राहिल्याने, आता या कामासाठी स्पीड पोस्ट व इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर करण्याचा प्रस्ताव महासंचालकांनी बनविला आहे. त्यात समन्स, वॉरंट्स थेट टपाल विभागाकडे दिले जातील, तर संबंधितांचे ई-मेल, एसएमएस व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे त्यांना माहिती दिली जाणार आहे.मोठ्या निधीची आवश्यकताटपाल विभागाकडून सध्या पासपोर्ट पोहोचविले जातात. त्याच धर्तीवर त्यांच्याकडे वॉरंट्स व समन्सचे काम देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या कामासाठी गृहविभागाला किमान ५० कोटींची तरतूद सुरुवातीला करावी लागणार असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.त्यांच्या तुलनेत ई-मेल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप या अद्ययावत सुविधांचा वापर कमी खर्चात करता येणार आहे. मात्र, त्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करून, त्यात या बाबी अंतर्भूत करण्याची आवश्यकता आहे.ंचेक बाउन्सचे खटले सर्र्वाधिक : न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांमध्ये ५० हजारांवर खटले हे आयपीसी कलम १३८ अन्वये खोटे धनादेश (चेक बाउन्स) देऊन फसवणूक केल्याचे आहेत. एकूण खटल्यांमध्ये त्याचे प्रमाणे ५० टक्क्यांहून अधिक असून, त्याचे वॉरंट्स व समन्स वेळेवर लागू केले जात नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र