शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाला पैसे नसल्याने आत्महत्या; शेतकरी कन्येने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 00:21 IST

हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण व स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी पैसे नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याच्या मुलीने पिंपरी (शि़) येथे घरी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली.

कळंब (जि़ उस्मानाबाद) : हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण व स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी पैसे नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याच्या मुलीने पिंपरी (शि़) येथे घरी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली़ घटनेनंतर संतप्त नातेवाईकानी रविवारी सकाळी तिचे पार्थिव शिराढोण ठाण्यासमोर नेऊन ठिय्या मांडला होता़कोरडवाहू शेतकरी अविनाश राजेंद्र राऊत यांची मुलगी प्रगती (२०) ही मुरूड (ता. लातूर) येथील संभाजी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत होती. तृतीय वर्षात असलेली प्रगती हुशार व होतकरू होती. विविध स्पर्धा परीक्षा देवून नोकरीची संधी आजमावत होती. राऊत यांना केवळ एक एकर कोरडवाहू शेती आहे़ त्यामुळे ते कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलीच्या शिक्षणाचा खर्च मोलमजूरी करून भागवत होते.शनिवारी सकाळी प्रगतीने रेल्वेची मुंबई येथील परीक्षा देण्यासाठी व खासगी शिकवणी लावण्यासाठी पैसे लागणार असल्याचे वडिलांना सांगितले होते. राऊत यांनी पाचशे रुपये तिला दिला. आत्ताचा अर्ज भरून घे, मी फायनान्सकडून कर्ज काढून उर्वरित रकमेची सोय करतो, असे तिला सांगितले. त्यानंतर ते पत्नीसह कळंबला कर्ज मिळविण्यासाठी रवाना झाले. दिवसभर धावपळ करून त्यांनी ६० हजारांची रक्कम मिळविली़ मात्र सायंकाळी घरी आल्यानंतर प्रगतीने गळफास घेतल्याचे त्यांना समजले़ मुलीच्या भावास सरकारी नोकरी द्यावी, कुटुंबाला मदत देण्यांसाठी नातेवाईकांनी ठिय्या दिला होता.न्याय देण्याचे आश्वासनउपविभागीय अधिकारी डॉ. चारूशिला देशमुख यांनी नातेवाईकांची भेट घेवून मागण्या शासनस्तरावर कळविण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर प्रगतीवर अंत्यसंस्कार झाले.

टॅग्स :Suicideआत्महत्या