शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...अन् मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; आईला केला शेवटचा मेसेज, "मिस यू आई"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 09:39 IST

रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने बुधवारी सकाळी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने रेस्क्यू मोहीम राबविली. दुपारी दीडच्या सुमारास ओमचा मृतदेह बाहेर काढला.

नेवासा -'मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे', असा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आईला मेसेज करत एका तरुणाने प्रवरासंगम येथे पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून जीवन संपविले. महेश ऊर्फ ओम मोहन मोरे (वय २०, रा. बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर), असे त्या तरुणाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर येथे एका खासगी कंपनीमध्ये ओमचे वडील चालक आहेत. वडील, आई, लहान भाऊ यांच्यासह ओम मोरे हा बजाजनगर येथे वास्तव्यास होता. 

ओम मोरे याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आईच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून जीवन संपवत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने प्रवरासंगम येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारली. रात्री आईने मेसेज पाहिल्यानंतर ओमचा शोध सुरू झाला. दरम्यान, त्याच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन येथील गोदावरी पुलाजवळ मिळाले, तपास केला असता, ओमची दुचाकी प्रवरासंगम गोदावरी पुलावर मिळून आली. मंगळवारी रात्री नऊपासूनच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने बुधवारी सकाळी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने रेस्क्यू मोहीम राबविली. दुपारी दीडच्या सुमारास ओमचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय कबड्डी संघात निवडीसाठी दोन गुण कमी पडल्यानेही ओम तणावात होता, असे त्याचे चुलते अमर मोरे यांनी सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, संजय माने, राम वैद्य, नेवासा येथील मराठा आंदोलक अॅड. के. एच. वाखुरे, भाऊसाहेब वाघ, राजेंद्र उंदरे, दादा निपुंगे, संभाजी सोनवणे, प्रकाश निपुंगे हजर होते.

मराठा आरक्षणासाठी 'गोदावरी'त दुसरी आत्महत्या• २३ जुलै २०१८ रोजी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गंगापूर येथील काकासाहेब शिंदे यांनी उद्विग्न होऊन गोदावरी नदीवरील याच पुलावरून नदीपात्रात आत्महत्या केली होती.• त्यानंतर ओम मोरे यानेही मंगळवारी रात्री गोदावरी नदीत उडी मारून जीवन संपविले. ही येथील मराठा आरक्षणासाठीची दुसरी आत्महत्या ठरली.

मिस यू आई...मिस यू आई. जय व पप्पा, मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे. समाजासाठी एक जीव माझापण. जय आईसोबत कायम राहा.माझा मम्मीमध्ये खूप जीव आहे. यापुढे कायम चांगले जगा, असा आईच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज करीत ओम याने आपले जीवन संपविले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण