शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

मुलीच्या लग्नाआधीच आत्महत्या

By admin | Published: April 30, 2016 5:05 AM

चिंतेने ग्रासलेल्या वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अखेर मृत्यूला कवटाळले.

विवेक चांदूरकर,

वाशीम- तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत, दोन मुलींचे हात पिवळे केले. आता तिसऱ्या मुलीच्या विवाहासाठीही तयारी सुरू केली खरी; पण अवघ्या आठ दिवसांवर लग्नकार्य येऊन ठेपले असताना हाती पुरेसा पैसा नाही. काय करावं, पैसा कुठून आणावा, या चिंतेने ग्रासलेल्या वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अखेर मृत्यूला कवटाळले.रिसोड तालुक्यातील धोडप येथील शेतकरी बबनराव शंकर बोडखे यांच्याकडे केवळ दोन एकर शेती होती. तीन मुली, एक मुलगा आणि पत्नी, असे हे कुटुंब शेतीमध्ये राबून संसार चालवित होते. त्यांनी दोन मुलींचे लग्न केले. मुलगा गणेश नववीत शिकत आहे. त्यांची तिसरी मुलगी निकिता हिचा विवाह कोयाळी खुर्द येथील गोपाळ सिरसाट यांच्याशी जमला. ७ मे रोजी लग्न ठरले. लग्नाची तयारी झाली. कपडे घेतले, पत्रिकाही छापल्या; मात्र काही दिवसांपासून बबनराव यांना पैशांची चिंता सतावत होती. तीन वर्षांपासून वऱ्हाडावर निसर्ग कोपला आहे. त्यामुळे पुरेसे पीक आले नाही. बबनराव यांनी २०१० मध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे१८ हजार रूपये कर्ज घेतले होते.दूध व्यवसायासाठी २००८ मध्ये त्यांनी ५० हजार रूपये कर्ज घेतले होते. त्यातून व्यवसाय सुरू केला;मात्र म्हशीचा मृत्यू झाल्याने तो व्यवसायही बंद पडला. त्यामुळेत्यांना शेतीवरच अवलंबून राहावे लागले. बुधवारी रात्री शौचालयास जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर शेतातील झाडाला गळफास घेतल्याचे आढळले.