चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: December 10, 2015 03:09 IST2015-12-10T03:09:39+5:302015-12-10T03:09:39+5:30

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागून विदर्भ आणि मराठवाड्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

Suicide of Four Farmers | चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अमरावती/यवतमाळ /बीड : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागून विदर्भ आणि मराठवाड्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
अमरावतीतील कुंभारगाव येथील विनायक ठाकरे (४८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. यवतमाळमधील निंभा येथील श्यामराव टिचुकले (५७) यांनी विहिरीत उडी घेऊन मंगळवारी रात्री आत्महत्या केली. तसेच, बीडमधील दस्तगीरवाडीतील वैजनाथ लक्षमण चोपणे (३८) यांनी विषारी औषध प्राशन केले होते. तर केज तालुक्यात संतोष धर्मराज चाटे (३२) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून रविवारी विषारी द्रव प्राशन केले होते. रात्री मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide of Four Farmers