शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीच्या बदल्यात ऊस उत्पादकांना साखर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 05:44 IST

स्वाभिमानीचा प्रस्ताव : साखर आयुक्तालयाची तत्त्वत: मान्यता

- राहुल शिंदे 

पुणे/कोल्हापूर/मुंबई : अद्याप १७८ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी (उसाचा रास्त व किफायतशीर दर) दिलेला नाही. एफआरपी देऊ न शकणाºया साखर कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे साखरेच्या स्वरुपात द्यावेत, असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्याला तत्वत: मान्यता दिली आहे. सरकारने हा प्रस्ताव मान्य केला, तर ऊसउत्पादक शेतकºयांना एफआरपीच्या बदल्यात साखर मिळू शकेल.

साखर हंगाम सुरू होऊन ७० ते ८० दिवस झाले. शेतकºयांनी ऊस दिल्यावर १४ दिवसांत एफआरपी देण्याचा नियम आहे. राज्यात २९०० रुपये एफआरपी आहे. मात्र, १० कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम दिली आहे. उर्वरित कारखान्यांची रक्कम थकित आहे. त्यामुळे खा. शेट्टी यांनी सोमवारी आयुक्तालयाने कारखान्यांकडून साखर ताब्यात घेऊन लिलावात काढावी वा शेतकºयांना एफआरपीच्या बदल्यात साखर द्यावी, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅक्टोबर २०१८ मध्ये एफआरपीची रक्कम भागविण्यासाठी शासनाची तिजोरी रिकामी करू, असे आश्वासन दिले होते. भाजपाध्यक्ष अमित शहा २४ तारखेला कोल्हापुरात असून, त्यावेळी तिजोरी व तिची चावी कुठे कोठे आहे, असा प्रश्न शहा यांना शेतकरी विचारणार आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले.काय आहेत अडचणी?शेतकºयांना थेट साखर विकण्याची परवानगी मिळण्यासाठी कारखान्यांच्या उपविधीत दुरुस्ती करावी लागेल.च् या व्यवहारात जीएसटीची रक्कम कुणी भरायची, याचा निर्णय घ्यावा लागेल.च्एखाद्या शेतकºयास साखर नको असेल, तर काय? शेतकºयांनी ही साखर कुठे आणि कुणाला विकायची? त्याचा दर काय असेल? अशा प्रश्नांची उत्तरे मिळाल्याखेरीज हा प्रस्ताव स्वीकारला जाऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

शेतकºयांना साखर देण्यास कायदेशीर अडचण नाही. केवळ जीएसटीबाबत तोडगा काढावा लागेल.- शेखर गायकवाड, साखर आयुक्तराज्यातील १८८ पैकी केवळ १० कारखान्यांनी दिली १००% एफआरपी74 कारखान्यांनी एफआरपीचाएक पैसाही दिला नाही20% कारखान्यांनी ८०%पेक्षा जास्त एफआरपी दिलीराज्यात सोमवारपर्यंत ४९७ लाख टन ऊसाचे गाळप, ५२.०९ लाख टन झालेसाखरेचे उत्पादन झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना