शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा-यांवरील साखर साठा मर्यादा हटविली, केंद्राचा अध्यादेश : दर वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 02:18 IST

व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे.

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे.गेल्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी झाल्याने साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी एप्रिल २०००पासून केंद्राने व्यापाºयांवर साखरसाठा मर्यादा लागू केली होती. ३१ डिसेंबर रोजी तिची मुदत संपत आहे. यंदाच्या साखर हंगामात पहिल्या अडीच महिन्यांत ३० टक्के म्हणजे ६९ लाख ४० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत ते ५३ लाख ४६ हजार टन इतके होते. सध्या घाऊक बाजारातील साखरेचे दर ३००० ते ३१५० रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. सरकारच्या निर्णयाने मागणी वाढून साखरेचे दर वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.महाराष्ट्रात १५ डिसेंबर अखेर २५ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले. गतवर्षी याच कालावधीत ते १७ लाख २५ हजार टन होते. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात २३ लाख ३७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.साठा मर्यादा हटविण्याचा निर्णय म्हणजे व्यापाºयांना साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने दिलेली नाताळची भेट आहे.- प्रफुल्ल विठलानी, चेअरमन,आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनसाठा मर्यादा काढून टाकण्याची मागणी अनेक महिने करत होतो. नियंत्रणमुक्त केल्याने कोसळणारे दर थोडे सावरतील, पण बॅँकांची उचल आणि उसाची पहिल्या उचलीचा ताळतंत्र घालताना कारखान्यांची दमछाक होणार आहे.- पी. जी. मेढे,साखर कारखानदारीचे तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने