शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

साखरेचे भाव पडले, राज्याचे केंद्राकडे बोट

By अतुल कुलकर्णी | Updated: March 20, 2018 00:59 IST

राज्यात गतवर्षीच्या हंगामातील १२ लाख टन साखर शिल्लक असून यंदा ९४.४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ३१ मार्चपर्यंत साखर कारखाने चालू राहणार असल्यामुळे आणखी १२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल.

मुंबई : राज्यात गतवर्षीच्या हंगामातील १२ लाख टन साखर शिल्लक असून यंदा ९४.४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ३१ मार्चपर्यंत साखर कारखाने चालू राहणार असल्यामुळे आणखी १२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल. परिणामी, साखरेचे भाव ३५०० रुपये क्विंटलवरून २८५० पर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे उसाला एफआरपीनुसार कसा भाव द्यायचा, असा सवाल साखर कारखानदार करत आहेत. तर राज्य सरकारने यासाठी केंद्राकडे बोट दाखवले आहे.याबाबत राष्टÑीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, पाकिस्तानने जसे अनुदान देऊन साखरेची निर्यात केली तसे अनुदान देऊन राज्यातील २० लाख मेट्रीक टन साखर निर्यात केली किंवा केंद्राने ५० लाख टन साखरेची राखीव साठा योजना राबवली तरच साखरेचे भाव सुधारतील. अन्यथा पुढच्या वर्षी कारखानेच सुरू होऊ शकणार नाहीत. शेतात उभ्या उसालाही दर देण्याची वेळ सरकारवर येईल, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला आहे.राज्याची साखरेची गरज २४ लाख टन असताना महाराष्टÑात ११८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात १०१ सहकारी आणि ८६ खाजगी अशा १८७ साखर कारखान्यांनी आजमितीस ८५१.४८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ज्याचा उतारा ११.०९ आला आहे. देशपातळीवरदेखील आपल्याकडे १९ राज्यांत साखरेची निर्मिती होते. त्यांचा एकत्रितसाठा पाहिला तर सध्याच ७५ लाख मे. टन अतिरिक्त साखर झालीआहे. नव्याने तयार होणारीसाखर कारखान्यांमध्ये पडून आहे. या वर्षीचे उसाचे पीक २३ टक्क्यांनी वाढले. पुढच्या वर्षी त्यात ३०टक्के वाढ अपेक्षित आहे. केंद्राने एफआरपीनुसार दर दिले नाहीत तर खटले दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कारखाने कसे चालवायचे, असा सवालही वळसे पाटील यांनी केला.निर्यातीचा वेगही मंदावलामिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आयातीवर ड्युटी लावल्याने साखरेची आयात थांबली. पण निर्यातीवर शुल्क लावल्याने निर्यातीचा वेगही मंदावला. दुसरीकडे सहकारी साखर कारखाने बंद पडले तर त्याआडून चालणारे काँग्रेस, राष्टÑवादीचे राजकारणही संपुष्टात येईल असा समज भाजपात आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र