शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर नियंत्रणातच हवेत- महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 04:16 IST

गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही सणासुदीच्या काळात स्वस्त दरात साखर मिळावी या उद्देशानेच केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरसाठ्यावर मर्यादा आणल्याचे सांगून साखरेचे दर नियंत्रणातच राहायला हवेत

मुंबई : गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही सणासुदीच्या काळात स्वस्त दरात साखर मिळावी या उद्देशानेच केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरसाठ्यावर मर्यादा आणल्याचे सांगून साखरेचे दर नियंत्रणातच राहायला हवेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केले.आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने तीन दिवसीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या समारोप सत्रात बोलताना पंकजा मुंडे यांनी साखरेच्या साठ्यांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचे जोरदार समर्थन केले. या वेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील तसेच माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. पंकजा मुंडे यांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी जयंत पाटील आणि वळसे-पाटील यांची भाषणे झाली. यात केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर निर्बंध आणले आहेत. गरिबांना कमी दरात साखर मिळावी असे सगळ्यांनाच वाटते, परंतु त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ नये, अशी भूमिका या दोन्ही नेत्यांनी मांडली. शिवाय साखर उद्योगाबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.या पार्श्वभूमीवर बोलताना पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन केले. साखर उद्योगात शेतकरी आणि ग्राहक या दोन घटकांनाच प्राधान्य मिळायला हवे, असे मुंडे म्हणाल्या. साखर उद्योगाचे स्वरूप हंगामी असल्याने त्याबाबत दीर्घकालीन धोरण आखणे शक्य नाही. परदेशात १९२ दिवसांचा हंगाम असला तरी भारतात तशी परिस्थिती नाही. बीडसारख्या दुष्काळी भागात पाण्याअभावी काही वर्षे अवघ्या २५-३० दिवसांचे हंगाम झाले. ४० रुपयांची साखर ४५ झाली तर काय फरक पडतो, हा प्रश्न गैरलागू आहे. रेशनिंग दुकानातील साखर घेणाºया गरीब घटकासाठी पाच रुपयांचा हा फरकसुद्धा मोठा ठरतो, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली. साखर उद्योगातील सर्व घटकांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सरकार व साखर उद्योगातील दुवा म्हणून काम करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे