शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दराबाबत साखर कारखानदारांचे मौनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 06:49 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी, एफआरपी अधिक २०० रुपये कारखानदारांनी जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करण्याचे आवाहन केले होते.

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी, एफआरपी अधिक २०० रुपये कारखानदारांनी जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करण्याचे आवाहन केले होते. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत. पण, एकाही कारखान्याने दराची घोषणा केलेली नाही. कारखानदारांच्या मौनाबाबत शेतकऱ्यांमध्येही उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.महापूर आणि अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादकांसह सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाला दर किती असणार, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे. कारखानदार गळीत हंगाम सुरु करताना दराची नेहमीच घोषणा करतात. पण, यावर्षी सर्वच कारखानदारांनी गळीत हंगाम सुरु करताना दराची घोषणाच केली नाही. कारखानदारांच्या या भूमिकेवर शेतकरी संघटना गप्पच आहेत. साखर कारखानदार देखील काही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मौनामध्ये दडलंय काय, असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.काही कारखानदारांनी तर एकरकमी एफआरपी देणे कठीण असल्याने तीन टप्प्यामध्ये देण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले. पहिल्या टप्यात ८० टक्के, दुसरे दोन टप्पे १० टक्के करण्याबाबत साखर कारखानदारांमध्ये चर्चा चालू आहे. कारखानदारांची ही भूमिका लक्षात घेतल्यास, राजू शेट्टी यांनी जाहीर केलेली एफआरपी अधिक २०० शेतकºयांच्या पदरात पडतील, अशी परिस्थिती दिसत नाही.साखरेला ३५०० रुपये द्या : अरुण लाडसाखरेचे दर आजही प्रति क्विंटल ३१०० ते ३१५० रुपयांपर्यंतच आहेत. साखरेचे दर वाढल्याशिवाय कारखानदारांना एकरकमी एफआरपीची रक्कम देता येणार नाही. महागाई लक्षात घेतल्यास शेतकºयांनाही शेती परवडत नाही. म्हणून शासनाने साखरेचा किमान दर प्रति टन ३५०० रुपये करण्याची गरज आहे. तरच शेतकºयांना प्रति टन तीन हजारापर्यंत दर देता येणार आहे, अशी प्रतिक्रिया क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने