शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने आजपासून बंद; कारखानदारांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:59 IST

शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे.

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे तुटलेला ऊस गाळप करुन आज, बुधवारपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. ‘रयत क्रांती’ शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपये, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने विनाकपात ३२१७ रुपये, तर शेतकरी संघटनेने एकरकमी ३५०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील संताजी घोरपडे, ‘राजाराम’सह इतर कारखान्यानी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी तोडण्या रोखण्यास सुरुवात केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जात आहे. त्याचा फटका येथील कारखान्यांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.सध्या साखरेचा दर २९ रुपये आहे. बॅँकांकडून ८५ टक्क्यांप्रमाणे मिळणारी उचल आणि शेतकरी संघटनांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. ऊसतोडणी-वाहतूक खर्च, मागील हंगामातील कर्जाचे हप्ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे सध्या तरी दर देणे अशक्य असल्याने हंगाम बंद ठेवणेच योग्य होईल. अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी, त्यांच्या मदतीशिवाय हंगाम सुरू होणे अशक्य असल्याचे कारखानदारांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने