शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एलजीबीटीक्यूवरील मुनगंटीवार यांचे ‘ते’ विधान अज्ञानापोटी; सोनम कपूरने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 06:12 IST

विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान सरकारने विधानसभेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ (तिसरी दुरुस्ती) हे सुधारणा विधेयक मांडले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा सभागृहात 'एलजीबीटीक्यू ' समुदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांच्यावर या समुदायाकडून टीका होत असतानाच आता अभिनेत्री सोनम कपूर हिनेदेखील कडक शब्दांत त्यांना सुनावले आहे.

मुनगंटीवार यांनी अज्ञानातून आणि द्वेष भावनेतून ते वक्तव्य केले आहे, असे सोनमने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान सरकारने विधानसभेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ (तिसरी दुरुस्ती) हे सुधारणा विधेयक मांडले होते. विद्यापीठांच्या विविध मंडळांवर या समुदायातील सदस्यांना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे. त्यावर बोलताना मुनगंटीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली होती. 

आता तुम्ही या समित्यांवर समलिंगी लोकांना घेणार आहात का? त्याऐवजी एक संयुक्त वैद्यकीय समिती नाही का स्थापन करता येणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. इतकेच नव्हे, तर समलिंगी संबंध म्हणजे जनावरांशी संबंध ठेवणे होय. कुणीही समलिंगी संबंधांची अजून व्याख्या केलेली नाही. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या प्राण्याशी संबंध ठेवले असतील तर तो प्राणी येऊन त्याचे प्रमाणपत्र देणार आहे का, अशा शब्दांत त्यांनी आपला विरोध दर्शवला होता.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. या समुदायातील सदस्यांसोबत भेदभाव करता येणार नाही, असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाडे देताना स्पष्ट केले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSonam Kapoorसोनम कपूरLGBTएलजीबीटी