शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

"भटकत्या आत्म्याचा त्रास काहीच दिवस, त्यानंतर..."; शरद पवारांना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 12:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भटकती आत्माच्या उल्लेखावरुन सुधीर मुनगंटीवारांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Sharad Pawar On Bhatakti Aatma :  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीशरद पवार यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' म्हणून केला होता. मोदींनी केलेल्या टीकेवर निकालानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलं आहे. भटकती आत्मा म्हणत मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  भटकती आत्म्याच्या त्रास काही दिवस होईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

सोमवारी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वार्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान मोदींनी पुण्यात महायुतीच्या सभेत शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता.  "मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात, काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे," अशा शब्दात मोदींनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.   भटकती आत्मावरुन शरद पवारांचं प्रत्युत्तर

"आम्ही राजकीय पक्ष म्हणून एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले मोदी. माझ्या बाबतीत बोलले. माझ्या बाबतीत विधान काय तर हा भटकता आत्मा आहे. माझा त्यांनी असा उल्लेख केला की हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीनं बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहाणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

भटकती आत्म्याच्या त्रास काही दिवस - सुधीर मुनगंटीवार

"तुम्ही भटकती आत्म्यावरील कोणताही चित्रपट पाहून घ्या. पहिल्यांदा काही दिवस भटकती आत्म्याचा त्रास होतो पण काही दिवसांनी कोणीतरी येतो आणि त्या आत्म्याला एवढं शांत करतो. भटकत्या आत्म्याचा त्रास काही दिवस होईल. पण त्यापुढे होणार नाही," असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा